Daily Current Affairs: IAS व्हायचंय? मुलाखतीत असे प्रश्न विचारले जातात, भले भले गोंधळतात

| Updated on: Aug 06, 2022 | 1:49 PM

स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक वेळा उमेदवारांना चालू घडामोडींशी संबंधित सोप्या प्रश्नांची उत्तरेही देता येत नाहीत सरकारी नोकरीची इच्छा मात्र असते. मगपरीक्षा जवळ आली की उमेदवार तयारीला लागतात, पण करंट अफेअर्स सारख्य गोष्टी एकाच दिवसात वाचून होत नाहीत.

Daily Current Affairs: IAS व्हायचंय? मुलाखतीत असे प्रश्न विचारले जातात, भले भले गोंधळतात
IAS Quiz
Image Credit source: Social Media
Follow us on

Daily Current Affairs: दरवर्षी लाखो विद्यार्थी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. या स्पर्धा परीक्षांमध्ये (Competitive Exam) चालू घडामोडींशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न कधीकधी तुम्हाला अपयश देतात. मुलाखतीत (IAS Interview) तुम्ही गोंधळून जाता आणि मग अशा वेळी सगळी मेहनत वाया जाते. डेली करंट अफेअर्स (Daily Current Affairs)ही रोज वाचायची गोष्ट आहे तरच त्याचा योग्य वेळी उपयोग होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक वेळा उमेदवारांना चालू घडामोडींशी संबंधित सोप्या प्रश्नांची उत्तरेही देता येत नाहीत सरकारी नोकरीची इच्छा मात्र असते. मगपरीक्षा जवळ आली की उमेदवार तयारीला लागतात, पण करंट अफेअर्स सारख्य गोष्टी एकाच दिवसात वाचून होत नाहीत. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि उमेदवारांसमोर चालू घडामोडींशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आम्ही सादर करत आहोत. या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकता.

प्रश्न 1 – “कारगिल विजय दिवस” कधी साजरा केला जातो?

उत्तर- 26 जुलै रोजी.

प्रश्न 2 – कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांसाठी “स्मार्ट ई-बीट” प्रणाली सुरू केली आहे?

उत्तर – हरियाणा

प्रश्न 3 – जागतिक बँकेच्या ‘चीफ इकॉनॉमिस्ट’ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

उत्तर – इंदरमीत गिल

प्रश्न 4 – भारताने कोणत्या देशातील निर्वासितांसाठी यूएनआरडब्ल्यूएला 2.5 अमेरिकन डॉलरचे योगदान दिले आहे?

उत्तर  – पॅलेस्टाईन

प्रश्न 5 – “दिलीप कुमार इन द शॅडो ऑफ अ लिजेंड’ नावाचे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे?

उत्तर – फैसल फारुकी

प्रश्न 6 – सैन्यदलांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी तिन्ही दलांचे जॉइंट थिएटर कमांड स्थापन करण्याची घोषणा कोणी केली आहे?

उत्तर – राजनाथ सिंह

प्रश्न 7 – भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यासाठी “क्रिएट फॉर इंडिया” ही मोहीम कोणी सुरू केली आहे?

उत्तर – भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)

प्रश्न 8 – ‘बजराम बेग्झ’ यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे?

उत्तर आहे – अल्बेनिया

प्रश्न 9 – अमर शहीद चंद्रशेखर यांचा भव्य पुतळा कुठे बसवणार?

उत्तर – भोपाल

प्रश्न 10 – अलीकडे कोणत्या देशातील साकुराजिमा ज्वालामुखी सलग तीन दिवस उफाळून आला आहे?

उत्तर – जपान