AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs NAM : नामिबियाविरूद्ध पाकिस्तान संघात 5 खेळाडू वगळता सर्व नवे चेहरे, जाणून घ्या कसं ते

T20 World Cup 2026 : पाकिस्तानने भारताविरूद्धचा सामना 61 धावांनी गमावला आणि पुढचं गणित बिघडलं. आता पाकिस्तानला काहीही करून नामिबियाविरुद्धचा सामना जिंकणं भाग आहे. अन्यथा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. असं असताना नामिबियाविरुद्ध या वेळी पाच खेळाडू वगळता सर्व चेहरे नवीन आहेत.

PAK vs NAM : नामिबियाविरूद्ध पाकिस्तान संघात 5 खेळाडू वगळता सर्व नवे चेहरे, जाणून घ्या कसं ते
PAK vs NAM : नामिबियाविरूद्ध पाकिस्तान संघात 5 खेळाडू वगळता सर्व नवे चेहरे, जाणून घ्या कसं तेImage Credit source: ICC Twitter
| Updated on: Feb 17, 2026 | 4:26 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेत सर्वात मोठा उलटफेर हा झिम्बाब्वे ऑस्ट्रेलिया सामन्यात पाहायला मिळाला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतून बाद होण्याच्या वेशीवर आहे. दुसरीकडे, पाकिस्तानची स्थितीही अशीच आहे. भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव झाला. भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पराभवाची धूळ चारली. त्यामुळे पाकिस्तानचे 2 गुण तर गेलेच, पण नेट रनरेटची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे पाकिस्तानला शेवटच्या सामन्यात काहीही विजय मिळवावा लागेल. सुपर 8 फेरीसाठी पाकिस्तानला नामिबियाविरूद्धच्या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तान आणि नामिबिया दुसऱ्यांदा भिडणार आहेत. यापूर्वी वर्ल्डकप 2021 मध्ये आमनेसामने आले होते. तेव्हाच्या संघात असलेले पाच खेळाडू आताही आहेत. तर दहा नवे चेहरे आहेत.

टी20 वर्ल्डकप 2021 स्पर्धेत पाकिस्तानने नामिबियाला 45 धावांनी पराभूत केलं होतं. तेव्हा कर्णधारपदाची धुरा बाबर आझमच्या खांद्यावर होती. तेव्हाच्या संघात खेळलेले पाच खेळाडू आताही संघात असणार आहे. या व्यतिरिक्त इतर 10 खेळाडू पहिल्यांदा नामिबियाविरुद्ध खेळणार आहेत. बाबर आझमसह फखर जमान, मोहम्मद नवाज, शादाब खान आणि शाहीन शाह आफ्रिदी हे नामिबियाविरुद्ध खेळले आहे. तर साहिबजादा फरहान, ख्वाजा नफाय, उस्मान खान, सलमान आगा, फहीम अश्रफ, सईम आयूब, अबरार अहमद, नसीम शाह, सलमान मिर्जा आणि उस्मान तारीक हे दहा चेहरे नवीन आहेत. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात काही बदल पाहायला मिळू शकतात. या सामन्यात बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदीला आराम दिला जाऊ शकतो. तर फखर जमान आणि नसीम शाहला प्लेइंग 11मध्ये स्थान मिळू शकते.

नामिबियाचा संघ या स्पर्धेतून आऊट आहे. त्यामुळे नामिबियासाठी हा औपचारिक सामना आहे. कारण आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. नामिबियाने हा सामना जिंकला तर पाकिस्तानचा शेवट कटू होईल. कारण त्यांना या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागणार आहे. कारण अमेरिकेचा नेट रनरेट हा पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. त्यामुळे पाकिस्तानला हा सामना जिंकणं भाग आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...