AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026: एका सामन्याचा निकाल आणि तीन संघ स्पर्धेतून आऊट, या संघांना मिळाली सुपर 8 फेरीत जागा

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे हळूहळू सुपर 8 फेरीचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. न्यूझीलंड आणि कॅनडा सामन्यातील निकालानंतर आणखी एका संघाने सुपर 8 फेरी गाठली आहे. चला जाणून घेऊयात..

T20 WC 2026: एका सामन्याचा निकाल आणि तीन संघ स्पर्धेतून आऊट, या संघांना मिळाली सुपर 8 फेरीत जागा
T20 WC 2026: एका सामन्याचा निकाल आणि तीन संघ स्पर्धेतून आऊट, या संघांना मिळाली सुपर 8 फेरीत जागाImage Credit source: PTI
| Updated on: Feb 17, 2026 | 3:51 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीची चुरस येत्या काही दिवसात रंगणार आहे. साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत सहा संघांची वर्णी सुपर 8 फेरीत लागली आहे. तर दोन संघांचा निकाल लवकरच लागणार आहे. ग्रुप डी मध्ये न्यूझीलंड आणि कॅनडा यांच्यात सामना पार पडला. या सामन्यातील निकालामुळे ग्रुप डी मधील चित्र स्पष्ट झालं आहे. दोन संघ सुपर 8 फेरीत तर तीन संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडने कॅनडाविरूद्ध 8 विकेटने विजय मिळवला असून सुपर 8 फेरी गाठली आहे. यापूर्वी या गटातून दक्षिण अफ्रिकेने सुपर 8 फेरीत स्थान मिळवलं होतं. आता न्यूझीलंडने कॅनडाला पराभवाची धूळ चारली आणि सुपर 8 फेरीत एन्ट्री मिळवली आहे. या गटात दक्षिण अफ्रिकेचा संघ पहिल्या, तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. या गटातून अफगाणिस्तान, युएई आणि कॅनडाचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

भारताची सुपर 8 फेरीत एन्ट्री

ए गटातून भारताने पाकिस्तानला पराभूत करत सुपर 8 फेरीत स्थान पक्कं केलं आहे. दुसरीकडे, पाकिस्तान अमेरिका यांच्यात दुसर्‍या संघासाठी चुरस आहे. अमेरिकेचे सर्व सामने संपले आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत पाकिस्तानपेक्षा वरचढ असल्याने दुसर्‍या स्थानावर आहे. त्यामुळ पाकिस्तान नामिबिया सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. पाकिस्तानने हा सामना गमावला तर अमेरिकेला सुपर 8 फेरीचं तिकीट मिळेल. हा सामना पाकिस्तानने जिंकला तर प्रश्नच येत नाही.  पाकिस्तानला सुपर 8 फेरीत जागा मिळेल. पण सध्याची पाकिस्तानची स्थिती पाहता नामिबियाने हरवलं तर मात्र गाशा गुंडाळावा लागेल.

गट सी आणि बी

सुपर 8 फेरीत सी गटातून वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने एन्ट्री मारली आहे. तर स्कॉटलँड, इटली आणि नेपाळ या संघांना गाशा गुंडाळावा लागला आहे. तर गट बी मधून सुपर 8 फेरीत श्रीलंकेने एन्ट्री मारली आहे. ऑस्ट्रेलियाचं भवितव्य आता झिम्बाब्वेच्या हातात आहे. झिम्बाब्वेने आयर्लंडविरुद्धचा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेतून पत्ता कट होईल. तसेच झिम्बाब्वेला संधी मिळेल.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात