IIM मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, 14 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

| Updated on: Oct 31, 2021 | 12:15 AM

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, जम्मू यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वेब डिझायनर 1, लेखापाल 1, कनिष्ठ अभियंता 1 पदांची भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर हॉटेल सुपरवायझर महिला 1 आणि लोअर डिव्हिजन लिपिक या पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

IIM मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, 14 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नवी दिल्लीः  IIM Jammu Recruitment 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जम्मूने (Indian Institute of Management, Jammu) नॉन फॅकल्टी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. अशा परिस्थितीत इच्छुक आणि पात्र उमेदवार iimj.ac.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2021 आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

लोअर डिव्हिजन लिपिक या पदांवर नियुक्त्या करण्यात येणार

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, जम्मू यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वेब डिझायनर 1, लेखापाल 1, कनिष्ठ अभियंता 1 पदांची भरती केली जाणार आहे. त्याचबरोबर हॉटेल सुपरवायझर महिला 1 आणि लोअर डिव्हिजन लिपिक या पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. दुसरीकडे या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध शैक्षणिक पात्रता तपासू शकतात. यासह उमेदवार अधिकृत नोटीसमध्ये वयोमर्यादेसह संपूर्ण तपशील पाहू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करा, कारण फॉर्ममध्ये काही तफावत आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.

ही फी असेल

IIM जम्मूमधून विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पेमेंट प्रणालीद्वारे अर्ज शुल्क म्हणून 590 रुपये भरावे लागतील. यानंतर पैसे भरल्याची पावती अपलोड करावी लागेल. SC/ST/DAP उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. अर्ज शुल्क परत केले जाणार नाही किंवा कोणत्याही परिस्थितीत पुन्हा समायोजित केले जाणार नाही. याशिवाय शुल्क भरणे केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाईल. तसेच इतर पद्धती स्वीकारल्या जाणार नाहीत.

अशा प्रकारे निवड होणार?

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखत/लिखित/कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. यानंतर उमेदवार भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

संबंधित बातम्या

MPSC : राज्य सेवा पूर्व परिक्षेची फॉर्म भरण्याची मुदत वाढवली

Indian Navy MR Recruitment 2021: भारतीय नौदलात 300 जागांसाठी भरती, आजपासून नोंदणीला सुरुवात