दहावी पास आहात? मग सरकारी नोकरी करण्याची संधी, भरतीला सुरूवात, आजच करा अर्ज

HAL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी झटपट भरतीसाठी अर्ज करावीत. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही खरोखरच संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

दहावी पास आहात? मग सरकारी नोकरी करण्याची संधी, भरतीला सुरूवात, आजच करा अर्ज
Hindustan Aeronautics Limited
| Updated on: Jun 23, 2024 | 2:46 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी झटपट भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. hal-india.co.in या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती देखील आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.

30 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ही भरती प्रक्रिया 58 रिक्त पदांसाठी होत आहे. ऑपरेटरची विविध पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. ऑपरेटर (इलेक्ट्रिकल), ऑपरेटर (मेकॅनिकल), ऑपरेटर (फिटर), अशा विविध पदांसाठी भरती सुरू आहे.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 28 वयोगटापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये.

नोकरीचे ठिकाण हे नाशिक असणार आहे. विशेष बाब म्हणजे उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाहीये. https://optnsk.reg.org.in/ या लिंकवर जाऊन तुम्ही थेट पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिक सूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी. सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे.