NLC Exam 2021: हेल्थ इन्स्पेक्टर परीक्षेसाठीचं अ‍ॅडमिट कार्ड जारी, असं करा डाऊनलोड

| Updated on: Jun 14, 2021 | 2:57 PM

NLC इंडिया लिमिटेडने आरोग्य निरीक्षक परीक्षा 2021 चं प्रवेशपत्र जाहीर केले. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत ते NLC च्या अधिकृत वेबसाइट www.nlcindia.in वर जाऊन आपलं प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता. (Health Inspector Exam 2021 Admit Card released How to Download)

NLC Exam 2021: हेल्थ इन्स्पेक्टर परीक्षेसाठीचं अ‍ॅडमिट कार्ड जारी, असं करा डाऊनलोड
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई : NLC इंडिया लिमिटेडने आरोग्य निरीक्षक परीक्षा 2021 चं प्रवेशपत्र जाहीर केले. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत ते NLC च्या अधिकृत वेबसाइट www.nlcindia.in वर जाऊन आपलं प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता. NLC आरोग्य निरीक्षक परीक्षा 14 जून 2021 रोजी विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. (Health Inspector Exam 2021 Admit Card released How to Download)

प्रवेशपत्र कसं डाऊनलोड कराल?

  • सर्वप्रथम www.nlcindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या करिअर विभागावर क्लिक करा.
  • एनएलसी आरोग्य निरीक्षक परीक्षा 2021 प्रवेश पत्रांवर क्लिक करा.
  • आपल्याला लॉगिन करावं करेल.
  • ईमेल आयडी, पासवर्ड टाका आणि लॉगिन बटणावर क्लिक करा.
  • एनएलसी आरोग्य निरीक्षक परीक्षा 2021 प्रवेश पत्र डाउनलोड करा

निवड प्रक्रिया कशी असणार?

लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड गुणवत्तेच्या आधारे होईल.

पगार किती?

ही NCL आरोग्य निरीक्षक भरती 18 रिक्त जागांसाठी घेण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा वेतन म्हणून 38,000 रुपये मिळतील.

(Health Inspector Exam 2021 Admit Card released How to Download)

हे ही वाचा :

बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची संधी, 57 हजार मिळू शकतो पगार, असा करा अर्ज…

Job News: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये अ‍ॅप्रेंटिसशिपची संधी