
मुंबई : भारतीय नौदलात काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. स्वप्न उराशी बाळगून तरूण त्या दिशेने प्रयत्न करत आसतात. आता भारतीय नौदलात दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. आता दहावी पास उमेदवारांची देश सेवा करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण भारतीय नौदलातील पदासाठी उच्च शिक्षणाची गरज नाही. तुम्ही अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in
याबाबत माहिती घेऊ शकता. भारतीय नौदलात ट्रेड्समॅनसाठी अर्ज दाखल करू शकता. अर्ज प्रक्रिया 26 ऑगस्ट 2023 पासून सुरु झाली आहे. तसेच अर्ज करण्यासाठी 25 सप्टेंबर 2023 पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. रजिस्ट्रेशन आणि फी जमा करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर आहे. आता नेमक्या किती जागा आहेत आणि कसा अर्ज करावा ते जाणून घेऊयात..
भारतीय नौदलात एकूण 362 जागा आहेत. यात जनरल क्लाससाठी 151 जागा, ओबीसीसाठी 97 जागा, ईडब्ल्यूएससाठी 35 जागा आहेत. अनुसूचित जातींसाठी 26 जागा आहेत. या पदासाठी निवड झाल्यास महिन्याला 18 हजार ते 56,900 इतका पगार मिळेल.
भारतीय नौदलात भरतीसाठी विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास होणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांकडे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टिट्यूट (आयटीआय) मधून रिलेटेड ट्रेडमधलं सर्टिफिकेट हवं. दुसरीकडे उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्षादरम्यान असणं गरजेचं आहे. जे उमेदवार आरक्षित श्रेणीत येतात त्यांना सरकारी नियमानुसार वयात सूट दिली जाईल.
अर्ज केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा, स्किल टेस्ट आणि डॉक्यूमेंट व्हेरिफेकशन प्रोसेसमधून जावं लागेल. ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षा झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. त्यानंतर डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर मेरिटच्या आधावर उमेदवारांना पोस्टिंग दिली जाईल.