दहावी पास असणाऱ्यांसाठी महाभरती, थेट भारतीय नौदलात नोकरी करण्याची संधी, अर्ज करा आणि मिळवा सरकारी नोकरी

| Updated on: Dec 10, 2023 | 11:08 AM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नोेकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे फक्त दहावी पास असाल तरीही तुम्ही थेट केंद्र सरकारची नोकरी ही मिळणार आहे. नौदलात महाभरती सुरू आहे. विशेष बाब म्हणजे तुम्ही फक्त दहावी पास असाल तरीही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता ही मोठी संधीच आहे.

दहावी पास असणाऱ्यांसाठी महाभरती, थेट भारतीय नौदलात नोकरी करण्याची संधी, अर्ज करा आणि मिळवा सरकारी नोकरी
Follow us on

मुंबई : दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी बंपर भरती सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी पास असणारे उमेदवार थेट भारतीय नौदलात काम करू शकतात. खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. नुकताच भारतीय नौदलाने भारतीय नौदल नागरी प्रवेश परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. यानुसार उमेदवार हे अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. थेट भारतीय नौदलात तुम्ही काम करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही 18 डिसेंबरपासून अर्ज करू शकता. ही एक बंपर भरती नक्कीच आहे.

भारतीय नौदलात तब्बल 910 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 डिसेंबर 2023 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे दाखल करावे लागतील. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. कुठेही असाल तरीही तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

विशेष म्हणजे भारतीय नौदलाने या भरती प्रक्रियेसाठी मुलींना खास सूट दिल्याचे बघायला मिळतंय. या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी मुलींना एकही रूपया फिस ही लागणार नाहीये. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. उमेदवार हा दहावी असावा, तसेच त्याच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेला असावा. चार्जमन या पदासाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र या विषयात पदवी असणे आवश्यक आहे. वरिष्ठ ड्राफ्ट्समन या पदासाठी दहावी उत्तीर्ण आणि ड्राफ्ट्समनशिपमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला असावा.

ट्रेडसमन मेट या पदासाठी उमेदवाराकडे दहावी पासचे प्रमाणपत्र आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेला असावा. तर मग उशीर न करता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 डिसेंबर 2023 आहे. यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. अर्ज करा आणि थेट मिळवा नौदलात नोकरी.