ISRO JTO पदांची भरती, प्रतिमहिना पगार 1.12 लाख रुपये

| Updated on: Nov 02, 2021 | 8:06 AM

इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरमधील कनिष्ठ भाषांतर अधिकारी पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार isro.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सुरू झाली असून, उमेदवार 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतील.

ISRO JTO पदांची भरती, प्रतिमहिना पगार 1.12 लाख रुपये
isro jto recruitment 2021
Follow us on

नवी दिल्ली : ISRO JTO Recruitment 2021: ISRO मध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी नोकरीची संधी आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC) मध्ये भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलीय. 30 ऑक्टोबर 2021 रोजी संस्थेने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार कनिष्ठ भाषांतर अधिकारी (JTO) च्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ISRO ने एकूण 6 JTO पदांसाठी अर्ज मागवलेत, त्यापैकी 5 पदे अनारक्षित आहेत, तर उर्वरित 1 पद SC उमेदवारांसाठी राखीव आहे.

इस्रो जेटीओ भरतीसाठी अर्ज प्रक्रिया

इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरमधील कनिष्ठ भाषांतर अधिकारी पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार isro.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सुरू झाली असून, उमेदवार 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतील. ऑनलाईन अर्जादरम्यान उमेदवारांना 250 रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग) भरता येईल. इस्रोने उमेदवारांना ऑफलाईन फी भरण्याचा पर्याय देखील दिलाय आणि उमेदवार एसबीआय चलनाद्वारे अर्ज फी भरण्यास सक्षम असतील.

इस्रो जेटीओ भरतीसाठी पात्रता निकष

इस्रोने जारी केलेल्या JTO भरती अधिसूचनेनुसार, केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केलीय आणि पदवी स्तरावर इंग्रजी हा विषय किंवा माध्यम म्हणून परीक्षा घेतलीय. तसेच 20 नोव्हेंबर 2021 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अनारक्षित पदांसाठी राखीव श्रेणींमध्ये उच्च वयोमर्यादेत कोणतीही सवलत दिली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

IIM मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जम्मूने (Indian Institute of Management, Jammu) नॉन फॅकल्टी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. अशा परिस्थितीत इच्छुक आणि पात्र उमेदवार iimj.ac.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2021 आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

संबंधित बातम्या

MPSC : राज्य सेवा पूर्व परिक्षेची फॉर्म भरण्याची मुदत वाढवली

Indian Navy MR Recruitment 2021: भारतीय नौदलात 300 जागांसाठी भरती, आजपासून नोंदणीला सुरुवात