इस्रोमध्ये 300 हून जास्त पदांसाठी जागा रिक्त, अर्ज कसा करायचा? वाचा सविस्तर…
इस्त्रोने 300 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांना 56 हजारांपेक्षाही जास्त पगार मिळेल, परंतू अर्ज कसा करायचा, अर्ज कोण करु शकतं, फि किती? चला संपुर्ण माहिती या लेखातून जाणून घेऊया...

इस्रो जॉब्स 2025: जर तुम्ही इंजिनिअर असाल आणि स्पेस सायन्समध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर आता ते स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते. इस्रोने अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. भरतीची शेवटची तारीख 16 जून आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर पदांसाठी मोठी भरती सुरु केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
किती रिक्त जागा आहेत?
इस्रोने विविध शाखांमध्ये एकूण 320 पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
- * साइंटिफिक इंजिनिअर एससी (इलेक्ट्रॉनिक्स) – 113 पदे
- * साइंटिफिक इंजिनिअर एससी (मेकॅनिकल) – 160 पदे
- * साइंटिफिक इंजिनिअर एससी (कॉम्प्युटर सायन्स) – 44 पदे
- * इलेक्ट्रॉनिक्स (पीआरएल) – 2 पदे
- * कंप्युटर सायन्स (पीआरएल) – 1 पद
पात्रता काय आहे?
उमेदवारांकडे संबंधित विषयात बीई किंवा बी.टेक पदवी असावी. याशिवाय,जर निकाल वेळेवर आला तर, अंतिम वर्षात इंजिनिअरींगची पदवी पूर्ण करणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा आणि सूट
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 28 वर्षे असावे. तसेच, एससी, एसटी, ओबीसी आणि दिव्यांग उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
किती पगार दिला जाईल?
निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला दर महिना 56,100 रुपये पगार मिळेल. याशिवाय, एचआरए, डीए आणि इतर सरकारी भत्ते देखील उपलब्ध असतील. म्हणजेच, या भरतीद्वारे फक्त सन्मानच मिळणार नाही तर आर्थिकदृष्ट्या मजबूत करिअरची सुरुवात होऊ शकते.
निवड कशी होईल?
- 1. लेखी परीक्षा – ज्यामध्ये तांत्रिक आणि सामान्य विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातील.
- 2. मुलाखत – ज्यामध्ये तुमची विचारसरणी, तांत्रिक समज आणि व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन केले जाईल.
फी आणि रिफंड सिस्टम
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी, सर्व उमेदवारांना 750 रुपये प्रोसेसिंग फि भरावी लागेल. विशेष म्हणजे एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना परीक्षेत बसल्यानंतर संपूर्ण फी परत केली जाईल. इतर उमेदवारांना देखील 500 रुपये परत मिळतील (प्रक्रिया शुल्क म्हणून फक्त 250 रुपये घेतले जातील).
अर्ज कसा करावा?
- 1. सर्वप्रथम इस्रोच्या वेबसाइट www.isro.gov.in वर जा.
- 2. रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- 3. NCS पोर्टलवर नोंदणी करा.
- 4. आता ‘Apply Now’ वर क्लिक करा आणि सर्व आवश्यक माहिती भरा.
- 5. तुमचे कागदपत्रे अपलोड करा आणि फी जमा करा.
- 6. अर्ज सबमिट केल्यानंतर, त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती सेव्ह करा.