AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MES Recruitment 2021 : मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विसमध्ये 502 पदांची भरती, ड्राफ्टमन आणि सुपरवायझर अर्ज करण्यासाठी शेवटची संधी

MES मध्ये ड्राफ्ट्समन आणि सुपरवायझर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. (MES Recruitment 2021)

MES Recruitment 2021 : मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विसमध्ये 502 पदांची भरती, ड्राफ्टमन आणि सुपरवायझर अर्ज करण्यासाठी शेवटची संधी
प्रातिनिधीक फोटो
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Apr 11, 2021 | 12:24 PM
Share

MES Recruitment 2021 नवी दिल्ली : सैन्य अभियंता सेवा (MES) कडून ड्राफ्टमन आणि सुपरवायझर पदासाठी भरती सुरु आहे. या भरती अंतर्गत (MES Recruitment 2021) 502 पदांवर भरती करण्यात येणार आहे. मिलिटरी इंजिनअरिंग सर्विसमधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी 12 एप्रिलला हा शेवटचा दिवस आहे. MES च्या mesgovonline.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. ड्राफ्टमन आणि सुपरवायझर पदासाठी 16 मे रोजी परीक्षा होणार आहे. (MES Recruitment 2021 Draughtsman and Supervisor post recruitment know full details)

ड्राफ्टमन आणि सुपरवायझर पदासाठी अर्ज कसा करावा?

स्टेप 1: MESच्या वेबसाईट mesgovonline.com ला भेट द्या. स्टेप 2: नवीन नोंदणी(New Registration)च्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: आता ‘Application for the Post [Draughtsman (D’Man)] OR [Supervisor Barrack Store (Supvr BS)]’ च्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 4: तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरुन नोंदणी आणि अर्ज करा. स्टेप 5: अर्जाची प्रिंट काढा, जेणेकरून भविष्यात कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

या शहरांमध्ये परीक्षा घेण्यात येणार

ड्राफ्टमन आणि सुपरवायझर पदासाठी 16 मे 2021 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देशातील विविध शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. यात प्रयागराज (अलाहाबाद), लखनऊ, बरेली, दिल्ली, चंदीगड, जबलपूर, भोपाळ, जयपूर, रांची, नागपूर, देहरादून, कोलकाता, गुवाहाटी, गांधीनगर, कोची, पठाणकोट, चेन्नई, पोर्ट ब्लेअर, पुणे, शिलांग आणि सिलीगुडी अशा अनेक शहरांचा समावेश आहे.

रिक्त पदांचा तपशील

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. MES मध्ये एकूण 502 पदांची भरती करण्यात येईल. सुपरवायझर पदासाठी 450 पदे आहेत. यापैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 183 पदे, ओबीसीसाठी 120 पदे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागासाठी 45 जागा, अनुसूचित जमातीसाठी 69 आणि एसटीसाठी 33 जागा आहेत. त्याचबरोबर ड्राफ्टमन पदासाठी 52 जागा आहेत.

संबंधित बातम्या:

MES Recruitment 2021 : मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विसकडून ड्राफ्टमन आणि सुपरवायझर पदासाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख नजीक

टेस्लामध्ये 10,000 बेरोजगारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, पदवीशिवाय मिळणार नोकरी, Elon Musk ची ऑफर

(MES Recruitment 2021 Draughtsman and Supervisor post recruitment know full details)

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला