MPSC Student: MPSC च्या विद्यार्थ्यांचं पत्ते, गोट्या, विटी दांडू खेळून आंदोलन! आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध

शिवाजीनगर परिसरात या विद्यार्थ्यांना पत्ते, गोट्या, विटी दांडू आणि दोरीच्या उड्या मारुन खेळ खेळत या निर्णयाचा निषेध केलाय. अनेक खात्यातील जागा रिक्त असतानाही त्या भरल्या जात नाही आणि असे निर्णय घेऊन सरकार पोरखेळ करत असल्याचं या विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे.

MPSC Student: MPSC च्या विद्यार्थ्यांचं पत्ते, गोट्या, विटी दांडू खेळून आंदोलन! आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध
MPSC PUNE Student's Strike
Image Credit source: TV9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 22, 2022 | 2:29 PM

पुणे: दहीहंडी उत्सव (Dahihandi Festival) ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत नेहमीप्रमाणेच हा उत्साह शिगेला पोहचलेला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका दहीहंडी उत्सवात हजेरी लावली होती. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली होती. श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंदशी संपूर्ण मराठीत संवाद साधला. या उत्सवात मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली जी घोषणा चांगलीच चर्चेत आहे. महाराष्ट्रातील गोविंदांना (Govinda Maharashtra) सरकारी नोकरीत (Government Jobs) 5 टक्के आरक्षण मिळेल अशी ती घोषणा होती. गोविंदा पथकातील गोविंदांना पाच टक्के क्रिडा आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत निषेध केलाय. शिवाजीनगर परिसरात या विद्यार्थ्यांना पत्ते, गोट्या, विटी दांडू आणि दोरीच्या उड्या मारुन खेळ खेळत या निर्णयाचा निषेध केलाय. अनेक खात्यातील जागा रिक्त असतानाही त्या भरल्या जात नाही आणि असे निर्णय घेऊन सरकार पोरखेळ करत असल्याचं या विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे.

रस्त्यावर उतरण्याचा इशारा- MPSC समन्वय समिती

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय तर अनेकांनी त्याचा कडाडून विरोध केलाय ज्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा समावेश आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ काही शहरातील महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याचा आरोप एमपीएससी (MPSC) समन्वय समितीचे विद्यार्थी करत आहेत. त्याचबरोबर हा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा देखील इशारा त्यांनी दिलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “गोविंदाना सुट्टी आणि विमा पण दिला. आमदार प्रताप सरनाईक आणि इतर लोकप्रतिनिधींनी दहीहंडीला खेळाच्या दर्जाची मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली असून त्याचबरोबर सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळाले आहे. महाराष्ट्र गोविंदाचाही आहे. अपघात होऊ नये याची काळजी घ्या. प्रो कबडी प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल, असेही ते म्हणाले. हे सर्वसामान्याचे सरकार आहे. करोना अजून संपलेला नाही. त्यामुळे उत्सव काळजी घेऊन साजरे करा. गणेशोत्सव देखील मोठया उत्सवात साजरे झाले पाहिजे, दोन वर्षे थांबलो. हा सण सर्वात मोठा सण आहे.” असेही त्यांनी म्हटले.