NHAI Recruitment: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 90 उपव्यवस्थापकांची भरती, अर्ज कसा कराल?

NHAI ने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार, जाहिरात केलेल्या उपव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) पदांपैकी 6 अनारक्षित आहेत, तर 5 OBC (नॉन-क्रिमी लेयर), 3 SC , 1 ST आणि 2 EWS उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदांसाठी केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून वाणिज्य किंवा सीए किंवा सीएमएमध्ये पदवी उत्तीर्ण केली आहे किंवा वित्त विषयात एमबीए पदवी घेतली आहे.

NHAI Recruitment: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 90 उपव्यवस्थापकांची भरती, अर्ज कसा कराल?
nhai
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 12:38 AM

नवी दिल्ली : NHAI Recruitment 2021: NHAI मध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने उपव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) आणि उपव्यवस्थापक (तांत्रिक) या पदांच्या भरतीसाठी दोन स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध केल्यात. प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातींनुसार एकूण 90 पदांसाठी भरती करायची आहे. इच्छुक उमेदवार NHAI च्या अधिकृत वेबसाइट nhai.gov.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. उपव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर आहे आणि उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदांसाठी उमेदवार 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतील.

उपव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) पदासाठी भरती

NHAI ने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार, जाहिरात केलेल्या उपव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) पदांपैकी 6 अनारक्षित आहेत, तर 5 OBC (नॉन-क्रिमी लेयर), 3 SC , 1 ST आणि 2 EWS उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदांसाठी केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून वाणिज्य किंवा सीए किंवा सीएमएमध्ये पदवी उत्तीर्ण केली आहे किंवा वित्त विषयात एमबीए पदवी घेतली आहे. याशिवाय उमेदवारांना संबंधित कामाचा 4 वर्षांचा अनुभव असावा. तसेच अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवारांचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदासाठी भरती

दुसऱ्या भरतीच्या जाहिरातीनुसार NHAI द्वारे प्रसिद्ध केलेल्या उपव्यवस्थापक (तांत्रिक) भरती, जाहिरात केलेल्या 73 पदांपैकी 27 अनारक्षित आणि 21 OBC-NCL, 13 SC, 5 ST आणि 7 EWS उमेदवारांसाठी राखीव आहेत. फक्त तेच उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात, जे संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा (IES), 2020 च्या मुलाखती (व्यक्तिमत्व चाचणी) टप्प्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळाची पुणे पोलिसांकडून चौकशी होणार, सायबर विभागाकडे विद्यार्थ्यांची तक्रार

ISRO JTO पदांची भरती, प्रतिमहिना पगार 1.12 लाख रुपये