
मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही कामाची आणि महत्वाची बातमी आहे. थेट नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा ही या भरती प्रक्रियेसाठी घेतली जाणार नाहीये. थेट मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागणार आहे. थेट मुंबईमध्ये काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन मुंबई यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू झाली. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन मुंबई येथे नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.
या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून आयबीपीएसमध्ये पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेची सर्वात जास्त खास बाब म्हणजे परीक्षेचे नो टेन्शन आहे. थेट मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेच्या मुलाखतीसाठी आपल्याला 2 आणि 4 जानेवारी 2024 ला उपस्थित राहवे लागणार आहे.
या भरती प्रक्रियेतून आयटी डेटाबेस प्रशासक, विश्लेषक प्रोग्रामर, प्रोग्रामिंग सहाय्यक अशी विविध पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही देखील पदानुसार असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पेर्सोंनेल सिलेक्शन, आयबीपीएस हाऊस, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, कांदिवली पूर्व मुंबई येथे उपस्थित राहवे लागेल.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही ठेवण्यात आलीये. उमेदवारांना भरती प्रक्रियेला येताना मुळ अर्ज आणि कागदपत्रे सोबत आणावी लागणार आहेत. उमेदवाराची निवड ही मुलाखतीमधूनच होणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना तगडा पगार देखील मिळणार आहे. चला तर मग इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.