SSC CHSL Tier I Admit Card 2020 नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशनच्यावतीने आयोजित सीएचएसएल टियर -1 (SSC CHSL Tier I Admit Card 2020) परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार अॅडमिट कार्ड कर्मचारी चयन आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वरून डाउनलोड करू शकतात. या भरतीद्वारे एकूण 4726 पदांवर उमेदवारांची निवड करण्यात येईल. (SSC CHSL tier one admit card 2020 released download from here ssc.nic.in )
स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे सीएचएसएल (Combined Higher Secondary (10+2) Level) परीक्षेचं नोटिफिकेशन 06 नोव्हेंबर 2020 ला जारी करण्यात आलं होते. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 डिसेंबरपर्यंत सुरू होती. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टियर -1 आणि टियर -2 परीक्षेमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे. टियर -1 परीक्षेचे अॅडमिट कार्ड स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे वेबसाईटवर अपलोड करण्यात आलं आहे. ही परीक्षा 12 एप्रिल ते 27 एप्रिल घेण्यात येणार आहे.
स्टेप 1 : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ssc.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2 : तिथे “STATUS / DOWNLOAD ADMIT CARD FOR COMBINED HIGHER SECONDARY LEVEL (10+2) EXAMINATION – 2020 (TIER- I) TO BE HELD FROM 12/04/2021 TO 26/04/2021” यावर क्लिक करा
स्टेप 3 : नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉगीन करा
स्टेप 4 : अॅडमिट कार्ड ओपन होईल ते डाऊनलोड करुन प्रिंटआऊट घ्या.
Combined Higher Secondary (10+2) Level परीक्षेद्वारे लोअर डिव्हिजनल क्लार्क, ज्यूनियर सेक्रेटेरीएट असिस्टंट, पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, डाटा एंट्री ऑपरेटर्स (DEOs) पदांवर निवड केली जाणार आहे. या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना टियर 1, टियर 2 आणि कौशल्य चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. टियर 1 मध्ये 100 गुणांसाठी बहूपर्यायी स्वरुपात परीक्षा होणार आहे.
PM-kisan: किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम एप्रिलमध्ये मिळणार, आतापर्यंत किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ?https://t.co/OCU0ZRVjYU
#PMkisan | #kisan | #kisansamman | #india | #Agrinews— TV9 Marathi (@TV9Marathi) March 28, 2021
संबंधित बातम्या:
GATE 2021 परीक्षेचे अॅडमिट कार्ड आले, असं कराल डाऊनलोड
(SSC CHSL tier one admit card 2020 released download from here ssc.nic.in )