AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GATE 2021 परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड आले, असं कराल डाऊनलोड

GATE 2021 परीक्षेचे प्रवेश पत्र (Admit Card) इंडियन इनस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईकडून जारी करण्यात आले आहे

GATE 2021 परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड आले, असं कराल डाऊनलोड
गेट परीक्षेचा निकाल या दिवशी होणार जाहीर
| Updated on: Jan 08, 2021 | 5:22 PM
Share

नवी दिल्ली: GATE  2021 परीक्षेचे प्रवेश पत्र (Admit Card) इंडियन इनस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईकडून जारी करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी GATE परीक्षेसाठी अर्ज केला असेल त्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. GATE2021 परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी www.gate.iitb.ac.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. (IIT Bombay released GATE2021 Admit Card)

GATE 2021 परीक्षा पुढील महिन्यात होणार आहे. GATE म्हणजेच ग्रॅज्युएट अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरींग 2021 परीक्षा अभियांत्रिकी आणि विज्ञान विद्याशाखांमधील प्रवेशांसाठी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. विद्यार्थ्यांना आयआयटी, मुंबईच्या वेबसाईटवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर परीक्षेसंबंधी सूचना उपलब्ध होतील.

इंडियन इनस्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर, आयआयटी मुंबई, दिल्ली, गुवाहती, खरगपूर, कानपूर, मद्रास, रुरकी यांच्याकडून दरवर्षी रोटेशन पद्धतीनं परीक्षेचे आयोजन करण्यात येते. GATE 2021 ची परीक्षा आयआयटी मुंबईकडून घेतली जात आहे. यंदाची गेट परिक्षा 27 विषयांमध्ये घेतली जाणार आहे. गेट परीक्षा फेब्रुवारी महिन्यातील 5,6,7,12,13 आणि 14 तारखेला होणार आहे.

GATE Admit Card 2021 कसं डाऊनलोड कराल

1.GATE 2021 परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी gate.iitb.ac.in या वेबसाईटला भेट द्या 2. GATE Admit Card 2021 या लिंकवर क्लिक करा 3. यानंतर पुढील टॅब वर नोंदणी क्रमांक आणि इतर माहिती भरावी लागेल 4. यानंर अ‌ॅडमिट कार्ड दिसेल. 5. अ‌ॅडमिट कार्डमधील माहिती चेक करुन डाऊनलोड करा 6. पुढील काळातील माहितीसाठी अ‌ॅडमिट कार्डची प्रिंट काढून सोबत ठेवा.

GATE परीक्षेचा निकाल 22 मार्च 2021 ला जाहीर होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गामुले गेट परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केले जाऊ शकता. GATE परीक्षेच्या अधिक माहितीसाठी सातत्यानं IIT GATE च्या वेबसाईटला भेट द्या.

JEE Advanced 2021 परीक्षेची तारीख जाहीर

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी JEE Advanced 2021 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा आयआयटी खरगपूरतर्फे 3 जुलै रोजी घेण्यात येईल. या परीक्षेसाठी लागणारी 75 टक्केची अट रद्द कऱण्यात आल आहे. केंद्र सरकारनं JEE Main 2020 परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेल्या पण कोरोनामुळे दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना JEEAdvanced2021 च्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे.

संबंधित बातम्या:

CBSE परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत नाहीच, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

JEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला

(IIT Bombay released GATE2021 Admit Card)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.