AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात क्रूर, सर्वात शार्प! मोजतबा यांच्या सुरक्षेसाठी खास सैनिक, ट्रम्पलाही फुटला घाम

अमेरिका-इस्रायल हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर, त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल सध्या अनेक अफवा आहेत. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे ते जाणून घेऊया...

सर्वात क्रूर, सर्वात शार्प! मोजतबा यांच्या सुरक्षेसाठी खास सैनिक, ट्रम्पलाही फुटला घाम
NOPOImage Credit source: Reuters
| Updated on: Mar 16, 2026 | 6:44 PM
Share

गेल्या तीन आठवड्यांपासून इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करताना दिसत आहेत. इराणने देखील प्रत्युत्तर देताना आखाती देशांमधील अमेरिकेची लष्करी तळे उद्धवस्त केली. तसेच इस्त्रायलच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये मोठे नुकसान झाले. इराणचे सुप्रिम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर इराणचे नवे सुप्रीम लीडर मुजतबा अली खामेनेई बनले. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी एका अत्यंत गुप्त आणि कठोर एलीट फोर्सकडे सोपवण्यात आली आहे. या फोर्सवर अमेरिकेने २०२१ मध्ये मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपाखाली बंदी घातली आहे.

प्रकरण काय आहे?

२८ फेब्रुवारीला अमेरिका-इस्रायलने इराणविरुद्ध ‘ऑपरेशन एपिक फ्यूरी’ सुरू केले. या मोहिमेच्या पहिल्या दिवशी तेहरानवर झालेल्या हल्ल्यात माजी सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली खामेनेई आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा मुजतबा गंभीर जखमी झाला होता. ८ मार्चला इराणच्या एक्सपर्ट्स असेंब्लीने मुजतबा खामेनेई यांना नवे सुप्रीम लीडर म्हणून निवडले. मात्र ते अद्याप सार्वजनिकरीत्या समोर आलेले नाहीत. इस्रायलने त्यांना मारण्याची खुलेआम धमकी दिल्याने त्यांना अत्यंत उच्च सुरक्षा व्यवस्थेत गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी NOPO या विशेष कमांडो युनिटकडे देण्यात आली आहे.

NOPO म्हणजे काय?

NOPO हे फारसी भाषेतील ‘निरूये विजेह पासदारान वेलायत’ या वाक्याचे संक्षिप्त रूप आहे. याचा अर्थ आहे सुप्रीम लीडर किंवा सरकारच्या सुरक्षेसाठी विशेष बल.

-स्थापना : १९९१

-हे इराणच्या स्पेशल युनिट्स कमांड अंतर्गत कार्य करते.

-मूळतः ‘रोहल्ला डिव्हिजन’मधून तयार करण्यात आले.

-हे IRGC (इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स) पासून वेगळे ठेवले गेले आहे.

-NOPO चे जवान काळ्या वर्दीत फिरतात.

-त्यांना अत्यंत कठोर शारीरिक, सामरिक, मार्शल आर्ट आणि आत्मरक्षा प्रशिक्षण दिले जाते.

-NOPO केवळ सुप्रीम लीडरची सुरक्षा करत नाही, तर ईरानातील दोन परमाणु संयंत्रांची सुरक्षा करण्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

NOPO वर गंभीर आरोप

या एलीट फोर्सवर अनेकदा जनआंदोलने बळजबरीने दडपण्याचे आरोप आहेत.

सप्टेंबर २०२२ – महसा अमीनीच्या मृत्यूनंतर झालेल्या मोठ्या जनआंदोलनात ५०० हून अधिक लोक मारले गेले. NOPO वर या आंदोलनाला क्रूरपणे चिरडल्याचा आरोप.

१९९९ – विद्यार्थी आंदोलन बेरहमीने दडपणे.

मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपावरून अमेरिकेने २०२१ मध्ये NOPO वर बंदी घातली.

मुजतबा खामेनेई कोण आहेत?

मुजतबा अली खामेनेई (वय ५६) हे अनेक वर्षांपासून इराणी राजकारणात सक्रिय आहेत. ते फारसे सार्वजनिकरीत्या दिसत नाहीत, पण पडद्यामागे त्यांचा प्रभाव प्रचंड मानला जातो. विश्लेषकांच्या मते, त्यांचे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) सोबतही घनिष्ठ संबंध आहेत. सध्या मुजतबा खामेनेई यांना NOPO च्या कमांडोंनी अत्यंत गुप्त ठिकाणी ठेवले आहे. इस्रायलने त्यांना मारण्याची शपथ घेतल्याने त्यांची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले