JEEAdvanced 2021 परीक्षेची तारीख ठरली, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी JEEAdvanced 2021 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. JEE Advanced 2021 Exam Dates

JEEAdvanced 2021 परीक्षेची तारीख ठरली, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
रमेश पोखरियाल निशंक
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 6:42 PM

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी JEEAdvanced 2021 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा आयआयटी खरगपूरतर्फे 3 जुलै रोजी घेण्यात येईल. या परीक्षेसाठी लागणारी 75 टक्केची अट रद्द कऱण्यात आल आहे. केंद्र सरकारनं JEE Main 2020 परीक्षेमध्ये क्वालिफाय झालेल्या पण कोरोनामुळे दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना JEEAdvanced2021 च्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे. (JEE Advanced 2021 Exam Dates Announced Exam to be held on 3 July says Ramesh Pokhriyal)

रमेश पोखरियाल निशंक यांनी यावर्षीच्या JEEAdvanced2021 परीक्षेची तारीख जाहीर करताना मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. JEEMain 2020मध्ये JEEAdvanced2020 परीक्षेला पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना यंदाची JEEAdvanced2021 परीक्षा देता येईल.

रमेश पोखरियाल यांच्या घोषणेचे ट्विट

JEEAdvanced 2021 परीक्षेची तारीख ठरली, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

आयआयटी खरगपूर परीक्षेचे आयोजन करणार

JEEAdvanced2021परीक्षेचे आयोजन आयआयटी खरगपूर करणार आहेत. जॉईंट एक्झामिनेशन बोर्डाच्या सहकार्यानं आयआयटी खरगपूर परीक्षेचे आयोजन करेल. आयआयटीमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी JEEAdvanced परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असतं

75 टक्केंची अट रद्द

JEEAdvanced परीक्षेला बसणायासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना बारावीला 75 टक्के गुण मिळवणं आवश्यक होते. मात्र, यावर्षी 75 टक्के गुणांची अट रद्द करण्यात आली आहे.

जेईईमेन परीक्षा 4 सत्रांमध्ये

रमेश पोखरियाल निशंक यांनी यापूर्वी जेईई मेन 2021 परीक्षा चार सत्रात होणार असल्याचं जाहीर केलं होते. पहिल्या सत्रातील परीक्षा फेब्रुवारी मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

CBSE परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत नाहीच, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

JEE आणि NEET परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सल्ला

(JEE Advanced 2021 Exam Dates Announced Exam to be held on 3 July says Ramesh Pokhriyal)

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.