GIC Recruitment 2021 : जीआयसीमधील अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख उद्या, असा करा अर्ज

| Updated on: Mar 28, 2021 | 5:24 PM

पदांच्या अर्जांच्या अधिसूचना अधिकृत वेबसाईटवर जारी केल्या आहेत. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जीआयसीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करण्यास 29 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. (The last date to apply for recruitment for various posts in GIC is tomorrow)

GIC Recruitment 2021 : जीआयसीमधील अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख उद्या, असा करा अर्ज
जीआयसीमधील अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख उद्या
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(General Insurance Corporation of India)ने जारी केलेल्या विविध पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची उद्या 29 मार्च 2021 रोजी अंतिम तारीख आहे. ज्या इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचे आहे, ते अधिकृत वेबसाईट gicofindia.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या रिक्त पदासाठी (GIC Recruitment 2021) अर्ज करण्याची प्रक्रिया 11 मार्च 2021 पासून सुरू आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळणार आहे. ही सरकारी नोकरी असेल. पदांच्या अर्जांच्या अधिसूचना अधिकृत वेबसाईटवर जारी केल्या आहेत. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जीआयसीमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करण्यास 29 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. (The last date to apply for recruitment for various posts in GIC is tomorrow)

पात्रता आणि वय मर्यादा

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (GIC) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी घेतली पाहिजे. पदवीसाठी 60 टक्के गुण मिळवणारे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. तर आरक्षणअंतर्गत योणाऱ्या उमेदवारांनी पदवीमध्ये 55% गुण मिळविणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असावे. राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांना वयाची सवलत देण्यात येईल.

कसा कराल अर्ज?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करा.
– सर्व प्रथम, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (GIC)ची अधिकृत वेबसाईट gicofindia.com वर जा.
– येथे मुख्यपृष्ठावरील करिअर ऑप्शनवर जा.
-‘Click here to apply online – Recruitment of Scale I Officers’ या लिंकवर क्लिक करा.
– आता आयबीपीएस पेज उघडेल.
– नवीन पृष्ठावर Click here for New Registration लिंकवर क्लिक करा.
– आता आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीच्या मदतीने नोंदणी करा.
– नोंदणीनंतर अर्ज भरता येईल.

रिक्त पदाचा तपशील

या भरती अंतर्गत जनरल विमा महामंडळातील 44 पदांवर भरती होईल. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 18, अनुसूचित जातीच्या 5, एसटीच्या 4, ओबीसीच्या 14, आर्थिकदृष्ट्या दुर्बल अर्थात ईडब्ल्यूएस 3 आणि पीडब्ल्यूडीच्या 2 जागांवर भरती होईल. रिक्त पदाच्या संपूर्ण तपशिलासाठी थेट लिंकवर क्लिक करा. (The last date to apply for recruitment for various posts in GIC is tomorrow)

इतर बातम्या

Video : होळीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी उत्तराखंडमध्ये पारंपरिक वाद्यांवर धरला ठेका!

VIDEO | कोव्हिड सेंटरच्या परिसरात कर्मचाऱ्यांची दारुची पार्टी, विरोध केल्यानंतर तरुणाला मारहाण