SCI Jobs : नोकरीसाठी काय पण करणार, न्यायालयाची पायरी पण चढणार ? ठीकाय मग उद्या शेवटची तारीख

| Updated on: May 13, 2022 | 6:22 PM

वयाच्या अटीत SC,ST आणि OBC प्रवर्गाला सूट देण्यात आलीये. नोकरीचं ठिकाण दिल्ली असेल. अधिक माहितीसाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याकरता खाली लिंक दिलेली आहे. अर्ज फक्त पोर्टलद्वारेच स्वीकारले जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता बघून पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

SCI Jobs : नोकरीसाठी काय पण करणार, न्यायालयाची पायरी पण चढणार ? ठीकाय मग उद्या शेवटची तारीख
सर्वोच्च न्यायालय
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) 25 रिक्त जागांची भरती सुरु केलीये उद्या या नोकरीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. कनिष्ठ अनुवादक (Junior Translator) पदाच्या या 25 रिक्त जागा आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन (Online) भरायचे आहेत. अर्ज करायची शेवटची तारीख उद्या 14 मे 2022 आहे. या पदांसाठी अर्ज करताना उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 32 वर्षे असावं. वयाच्या अटीत SC,ST आणि OBC प्रवर्गाला सूट देण्यात आलीये. नोकरीचं ठिकाण दिल्ली असेल. अधिक माहितीसाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याकरता खाली लिंक दिलेली आहे. अर्ज फक्त पोर्टलद्वारेच स्वीकारले जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता बघून पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

इंग्रजीमध्ये ग्रॅज्युएशन डिग्री असणे आवश्यक

ज्युनिअर ट्रान्सलेटरच्या या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इंग्रजीमध्ये ग्रॅज्युएशन डिग्री असणे आवश्यक आहे. याशिवाय त्यांना भाषांतराचा २ वर्षांचा अनुभवही असावा. अर्जदारांचे कमाल वय ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.

पदाचे नाव

कनिष्ठ अनुवादक (कोर्ट असिस्टंट )

हे सुद्धा वाचा

शैक्षणिक पात्रता

1) इंग्रजी विषयासह त्या त्या पदानुसार संबंधित विषयात पदवी असावी 2) ०2 वर्षाचा ट्रान्स्लेशनचा अनुभव असावा ( सविस्तर माहितीसाठी जाहिरात बघा )

महत्त्वाचे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2022

एकूण जागा – 25

वयाची अट – 1 जानेवारी 2021 रोजी – 18 ते 32 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट ]

अर्ज शुल्क – 500/- रुपये [ SC/ST/ PWD/ ExSM – शुल्क नाही ]

नोकरीचं ठिकाण – दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

वेतन – नियमानुसार