Jobs in 2026 : Resume पटापट अपडेट करा…नव्या वर्षात या क्षेत्रात बंपर भरती; पगाराचा आकडा पाहून…

Sarkari Jobs 2026 : या वर्षी सरकारी नोकरी मिळवायचीच असं जर तुमचं टार्गेट असेल तरी बातमी नक्की वाचाच. या वर्षी नोकरीच्या भरपूर संधी मिळणार असून पण त्यासंबंधीच्या जाहिरातींवर, माहितीवर घारीसारखी नजर ठेवणं गरजेचं आहे. त्यानुसार, तुम्ही तुमची तयारी करून अपडेटही राहू शकता.

Jobs in 2026 : Resume पटापट अपडेट करा...नव्या वर्षात या क्षेत्रात बंपर भरती; पगाराचा आकडा पाहून...
नव्या वर्षात या क्षेत्रात बंपर भरती
Image Credit source: freepik
| Updated on: Jan 02, 2026 | 1:31 PM

Upcoming Government Jobs 2025 : नव्या वर्षाचं स्वागत करून सगळे आता कामाला लागले आहेत. पण जे नोकरीच्या, चांगल्या जॉबच्या शोधात असतात, नोकरीची तयारी करत असतात त्यांच्यासाठी येणारं प्रत्येक वर्षं हे पेशन्सची परीक्षा पाहणारं असतं. सरत्या वर्षा तर मिळाला नाही पण येत्या वर्षात तर मला सरकारी नोकरी मिळवायचीच आहे… असं त्यांचं टार्गेट असतं. तुमचंही जर हेच टार्गेट असेल तर येणाऱ्या संधी, सरकारी भरतींसाठी आणखी कठोर तयारी करत असाल ना. दरवर्षी, देशात काही मोठ्या आणि महत्त्वाच्या भरती जाहीर केल्या जातात, ज्यामुळे मोठ्या संख्येने उमेदवार आकर्षित होतात. तुम्हीही या नोकरीची, भरतीची वाट बघत असाल तर ही बातमी नक्की वाचा आणि सॉलिड तयारी करून एकदम अपडेट रहा. जाणून घेऊया काही भरतींबद्दल..

SSC भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) दरवर्षी नियमितपणे CGL ते CHSL, SSC GD कॉन्स्टेबल आणि SSC MTS पर्यंतच्या असंख्य मोठ्या भरती जाहीर करते. याशिवाय, सीपीओ आणि जेई सारख्या परीक्षा देखील नियमित अंतराने घेतल्या जातात. या भरती यावर्षी देखील घेतल्या जातील. दहावी ते पदवीधरांपर्यंतचे उमेदवार वेळापत्रकानुसार अर्ज करू शकतील.

इंडिया पोस्ट GDS भरती 2026

टपाल विभागात, विशेषतः जीडीएस भरतीची तरूण हे उत्सुकतेने वाट पहात असतात. कारण त्यासाठी कोणतीही परीक्षा आवश्यक नसते. जीडीएस 2026 च्या रिक्त पदांची लवकरच घोषणा होण्याची अपेक्षा आहे. 2025 मध्ये, जीडीएससाठी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत अर्ज स्वीकारले गेले होते.

रेल्वेत नोकरी

रेल्वे भरती बोर्डाने (RRB) जाहीर केलेल्या २०२६ च्या वार्षिक कॅलेंडरनुसार, यावर्षी रेल्वेमध्ये जानेवारी-मार्चमध्ये असिस्टंट लोको पायलट, एप्रिल-जूनमध्ये टेक्निशियन, सेक्शन कंट्रोलर, ज्युनियर इंजिनिअर, जुलै-सप्टेंबरमध्ये पॅरामेडिकल श्रेणी असतील, तसेच NTPC, ऑक्टोबर- डिसेंबरमध्ये मिनिस्ट्रियल आणि आयसोलेडेट कॅटॅगरी, लेव्हल 1 भरती जाहीर केली जाऊ शकते.

बँक व्हेकन्सी

बँकेच्या परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठीही दरवर्षी भरती जाहीर केली जाते. त्यामध्ये आयबीपीएस क्लार्क, आयबीपीएस पीओ, एसबीआय क्लार्क, एसबीआय पीओ, आरआरबी क्लार्क/ पीओ आणि स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) सारख्या व्हेकन्सीज असतात. तुम्ही त्यासाठीही तयारी करू शकता.

UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षा 2026

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) दरवर्षी नागरी सेवांसाठी एक नवीन अधिसूचना जारी केली जाते. IAS किंवा IPS अधिकारी होण्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवार ही परीक्षा देतात. 2025 जानेवारी मध्ये या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यावर्षीही जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात यासंबंधीची जाहिरात येऊ शकते.

सैन्य भरती 2026

सैन्यात सामील होण्यासाठी, यूपीएससी वर्षातून दोनदा NDA आणि CDS कडून भरती आयोजित केली जाते. याव्यतिरिक्त, अग्निवीर आणि भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलातील इतर विविध प्रवेशांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. तुम्ही यासाठी देखील अर्ज करू शकता.

अन्य प्रमुख भरती

याशिवाय, दरवर्षी UPPSC, BPSC, MPPSC आणि इतर आयोगांसारख्या राज्यस्तरीय PCS परीक्षांद्वारे राज्य प्रशासकीय सेवांसाठी अर्ज घेतले जातात. बिहारमधील शिक्षक भरतीचा चौथा टप्पा, तसेच TRE 4.0, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. यूपी पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल आणि तुरुंग वॉर्डर्सची भरती आधीच जाहीर करण्यात आली आहे. 32 हजारांहून अधिक पदांसाठीची ही जाहिरात नुकतीच म्हणजे 31 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली. तुम्ही संपूर्ण जानेवारी महीना, त्यासाठी अर्ज करू शकता.