AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG सिलेंडरमध्ये 14.2 KG गॅस का असतो? 14 किलो वा 15 किलो का नसतो? ही कारणं वाचून विश्वास नाही बसणार

LPG Cylinder 14.2 KG: घरगुती गॅससाठी सध्या ग्राहक एजन्सीच्या बाहेर गर्दी करत आहेत. लांबच लांब रांगेत भल्यापाहटेपासून उभे आहेत. एलपीजी सिलेंडरमध्ये 14.2 KG गॅस का असतो? त्यापेक्षा कमी अथवा जास्त का नसतो, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. त्याचे उत्तर त्याहून आश्चर्यकारक आहे.

LPG सिलेंडरमध्ये 14.2 KG गॅस का असतो? 14 किलो वा 15 किलो का नसतो? ही कारणं वाचून विश्वास नाही बसणार
LPG Cylinder 14.2 KGImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 19, 2026 | 3:26 PM
Share

LPG Cylinder 14.2 KG: सध्या एलपीजी तुटवड्याने ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सरकारने मात्र विरोधकांमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे खापर फोडून हात वर केला आहे. पण एलपीजी सिलेंडर नेहमी 14.2 किलो गॅसच नेहमी का असतो? एलपीजी सिलेंडरमध्ये 14 किलो अथवा 15 किलो गॅस का नसतो? हा क्रमांक थोडा विचित्र वाटतो. पण एलपीजी सिलेंडर नेहमी 14.2 किलोच का असतो, याचे उत्तर त्यापेक्षा अधिक आश्चर्यकारक आहे. काय आहे त्यामागील तर्क?

14.2 किलोची सक्ती?

खरंतर 14.2 किलो गॅस ठेवण्याची सक्ती नाही. हा निर्णय बदलता ही येऊ शकतो. पण त्यामागे एक तर्क आहे. सर्वसामान्यांना गॅस सिलेंडर सहज वापरता यावे. त्याची वाहतूकच नाही तर घरातही सिलेंडर ओढून नेता येतो. ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडत नाही. तर हे सिलेंडर स्टँडर्ड मानले जाते. भारतात घरगुती LPG सिलेंडरचा वापर 1950 च्या दशकात सुरू झाला. त्यावेळी बर्मा शेल (Burmah Shell) नावाची एक परदेशी कंपनी गॅस पुरवठा करत होती. त्यावेळी या कंपनीने सर्वात अगोदर सिलेंडरचा आकार आणि वजन निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL) असे करण्यात आले.

ती तीन कारणं कोणती?

बर्मा शेल कंपनीने त्यावेळी तीन मोठी कारणं लक्षात ठेवून 14.2 किलोचा जादूई आकडा निश्चित केला. हा गॅस सिलेंडर सहज उचलता यावा आणि नेता यावा यासाठी 14.2 किलोची गॅस टाकी ठेवण्यात आली. तर रिकाम्या लोखंडी गॅस टाकीची एकूण वजन जवळपास 29 ते 30 किलोच्या जवळपास पोहचते. त्यावेळच्या सर्वेनुसार ही गॅस टाकी उचलता येत होती. जर गॅस टाकीचे वजन 30 किलो पेक्षा अधिक असते तर ते उचलण्यास आणि ने-आण करण्यास अडचण आली असती.

दुसरे मोठे कारण म्हणजे एका कुटुंबाच्या गरजेचा अंदाज त्यावेळी बांधण्यात आला. त्यावेळी तज्ज्ञांनी असा अंदाज बांधला होता की, मध्यमवर्गीय कुटुंबाला एका महिन्यासाठी साधारणतः किती गॅस लागू शकतो. संशोधनात हे समोर आले की जवळपास 30 ते 45 दिवसांसाठी हा गॅस पुरतो. म्हणजे एकदा गॅस भरल्यावर तो महिनाभऱ पुरतो.

नवीन सिलेंडर बुक झाल्यावर तो डिलिव्हर करणे कंपन्यांना सहज शक्य झाले. या संशोधनाआधारे गॅस सिलेंडर हा महिना अथवा सव्वा महिना जातो हे गॅस एजन्सीच्या लक्षात आले. त्यामुळे पुरवठ्याचे गणित जुळवता आले. अनेक वर्षांपासून हे मॉडेल यशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे.

Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम