स्टेट बँकेत लाखोंची चोरी, कुठे घडली नेमकी घटना?

| Updated on: Feb 21, 2023 | 12:16 PM

चोरट्यांनी रात्री मागच्या बाजूस असणाऱ्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर रंगीत स्प्रे मारून कॅमेरे निष्प्रभ केले. त्यानंतर गॅस कटरने तिजोरी कापून आतील रक्कम लांबवली.

स्टेट बँकेत लाखोंची चोरी, कुठे घडली नेमकी घटना?
चंद्रपूरमध्ये स्टेट बँकेत धाडसी चोरी
Image Credit source: Tv9
Follow us on

चंद्रपूर / निलेश डहाट (प्रतिनिधी) : शहरालगत असलेल्या पडोली येथील स्टेट बँकेच्या शाखेत 14 लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहराच्या एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात पडोली एसबीआय बँक शाखा आहे. चोरट्यांनी रात्री मागच्या बाजूस असणाऱ्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर रंगीत स्प्रे मारून कॅमेरे निष्प्रभ केले. त्यानंतर गॅस कटरने तिजोरी कापून आतील रक्कम लांबवली. सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी चोरुन नेला. चंद्रपूर पोलीस दलात नुकतेच मोठे फेरबदल झाल्यानंतर पोलिसांपुढे हे प्रकरण उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान उभे आहे.

सकाळी बँक कर्मचारी आल्यानंतर घटना उघडकीस

सकाळी बँक कर्मचारी शाखेत आल्यावर चोरीची घटना उघड झाली. यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पडोली पोलीस, चंद्रपूर पोलिसांचे गुन्हे शाखा पथक यांच्यासह पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

चोरट्यांनी बँकेच्या मागच्या बाजूने खिडकीचे गड कापून आत प्रवेश केला होता. तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने कापून रोकड लांबवली. चंद्रपूर पोलीस दलात नुकतेच मोठे फेरबदल झाले आहेत. यानंतर लगेच ही धाडसी बँक चोरी झाली. तसेच बँकेतील सीसीटीव्हीही फुटेजही चोरट्यांनी नेल्याने पोलिसांपुढे प्रकरण उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे. सध्या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

हे सुद्धा वाचा

ग्राहकांचे मोबाईल चोरणाऱ्या आरोपींना अटक

फ्लिपकार्ट कंपनीतर्फे ग्राहकांना वितरण करण्यासाठी आलेले मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात तुर्भे पोलिसांना यश आले आहे. विविध कंपनीचे आणि मॉडेलचे मोबाईल फोन चोरी केल्याची तक्रार तुर्भे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपीना पकडलं आहे.