तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, दोन दिवसांनी पोलिसांना हत्याकांडाचा उलगडा करण्यास यश

टाकेद परिसरात असलेल्या अडसरे बु या गावाच्या करंजी नावाच्या शेतात भाताच्या तनसाच्या गंजीजवळ एक 27 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला होता. ही तरुणी कोण आहे?, तिची हत्या का आणि कुणी केली? याबाबत अनेक तर्क-वितर्क करण्यात येत होते.

तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, दोन दिवसांनी पोलिसांना हत्याकांडाचा उलगडा करण्यास यश
इगतपुरीत अत्याचार करुन तरुणीची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 10:22 AM

इगतपुरी / शैलेश पुरोहित (प्रतिनिधी) : दोन दिवसापूर्वी शेतशिवारात आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाबात उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. सदर तरुणीवर अत्याचार केल्यानंतर चाकूने भोसकून तिची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलिसात याबाबत अज्ञात संशयितांविरोधात भादवी कलम 302, 376 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

दोन दिवसापूर्वी आढळला होता अज्ञात मुलीचा मृतदेह

इगतपुरी तालुक्यातील टाकेद परिसरात असलेल्या अडसरे बु या गावाच्या करंजी नावाच्या शेतात भाताच्या तनसाच्या गंजीजवळ एक 27 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला होता. ही तरुणी कोण आहे?, तिची हत्या का आणि कुणी केली? याबाबत अनेक तर्क-वितर्क करण्यात येत होते. प्रारंभी घोटी पोलिसांनी याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद केली होती.

शवविच्छेदन अहवालात अत्याचार करुन तरुणीची हत्या केल्याचे उघड

या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामिण अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन या युवतीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीबाबत सूचना दिल्या. दरम्यान, तरुणीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर बलात्कार करून धारदार शस्त्राने वार करून तिला जीवे ठार मारल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा

एक संशयित ताब्यात

या प्रकरणी घोटी पोलिसांत घटनेबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर घटनेबाबत पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीची कसून चौकशी घोटी पोलीस करत आहेत. तरुणीला ठार मारण्यामध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का याबाबतही स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा पोलीस प्रशासन तपास करत आहेत.

या गंभीर घटनेच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, घोटी पोलिसांचे पथक संशयितांच्या मागावर आहेत. घोटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप खेडकर, सहायक निरीक्षक श्रद्धा गंधास, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कवडे, पोलीस हवालदार राऊत, सुहास गोसावी, बस्ते आदी पुढील तपास करीत आहेत.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.