भयंकरच…दारू पिताच आंधळे झाले, रक्ताच्या उलट्याही; 14 जणांचा मृत्यू

विषारी दारुमुळे दरवर्षी अनेकांचे संसार उघड्यावर येत असतात. आता विषारी पिऊन दोन शहरातील तब्बल 14 जणांता मृत्यू झाला आहे. ही विषारी दारु प्यायल्याने आधी या लोकांना डोळ्यांनी दिसणे बंद झाले त्यांची दृष्टी संपूर्ण नष्ट झाली त्यानंतर काहींना रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला असता रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालावल्याचे उघडकीस आले आहे.

भयंकरच...दारू पिताच आंधळे झाले, रक्ताच्या उलट्याही; 14 जणांचा मृत्यू
poisonous liquor
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 11, 2023 | 1:48 PM

हरियाणा | 11 नोव्हेंबर 2023 : विषारु दारू पिल्यामुळे दरवर्षी अनेकांचा मृत्यू होत असतो. अनेकांचे प्राण त्यामुळे जात असतात. तरीही विषारु दारुवर बंदी आलेली नाही. त्यामुळे अनेकांचे प्राण दरवर्षी जात आहेत. अशाच विषारी दारुमुळे हरियाणात 14 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. एकाच दिवसात दारू प्यायल्याने सहा लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांना या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. यमूना नगर पोलिसांनी या प्रकरणात सात लोकांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणातील दारुचा तपास केला जात आहेत. या प्रकरणी अटक केलेल्या लोकांची चौकशी सुरु आहे.

हरियाणाच्या अंबाला आणि यमुनानगर परिसरात गेल्या काही दिवसात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 14 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या 14 पीडीतापैकी यमुनानगरातील 12 जणांचा तर अंबाला जिल्ह्यातील 2 व्यक्तींचा समावेश आहे. यमुनानगरातील मंडेबरी गावात तर एकाच दिवसात विषारी दारू प्यायल्याने 6 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर संपूर्ण गावात अवकळा पसरली आहे. गावातील काही लोक दारु तयार करुन विकतात. त्यांच्याकडील दारु प्यायल्यानंतर हा मृत्यूचा सिलसिला सुरु झाल्याचे गावातील लोकांनी सांगितले.

रक्ताच्या उलट्या आणि दृष्टी गेली

ही गावातील दारू प्यायल्यानंतर अनेक लोकांना रक्ताच्या उलट्या झाल्या तर काहींना डोळ्यांना दिसायचे बंद झाले. त्यानंतर गावातील लोकांनी त्यांना रुग्णलयात भरती केले. परंतू रुग्णालयात पोहचण्याआधीच त्यांचे प्राण गेले. डॉक्टरांनी मृत्यूस विषारी दारू जबाबदार असल्याचे म्हटले आहे. गावातील लोकांनी या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार करीत संपूर्ण माहीती दिली आहे. यमुना नगर पोलिसांना या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

आरोपींना झाली अटक

अंबालाचे एसपी जशनदीप सिंह रंधावा यांनी सांगितले की बिंजलपुर गावात दारुच्या फॅक्टरीतून ही दारु तयार करण्यात येत असून ती आजबाजूच्या गावातील लोकांना विकली गेली आहे. या प्रकरणात यमुना नगर पोलिसांनी सात लोकांना अटक केली आहे. हे आरोपी कॉंग्रेस पक्षांशी संबंधीत आहेत. गावात बेकायदेशीर दारु विकल्याच्या आरोपाखाली राजकुमार, नरेश कुमार, राजेश कुमार आणि राधेश्याम यांच्या विरोधात पोलिसांनी केस दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिस पुढील तपास करीत आहेत.