पोलीस असल्याचे सांगत चौकडीने 2.6 कोटींचे दागिने पळविले, हैदराबाद – सायन सर्कल ते भिवंडी पळवापळवी

| Updated on: Jun 02, 2023 | 4:59 PM

जेव्हा हैदराबादचे हे ज्वेलर आपल्या कारागिरासह त्यांच्या क्लायंटकडे इनोवा कारमधून बीकेसीला भारत डायमंडकडे निघाले असता त्यांच्या इनोवा कारला दुसऱ्या कारने ब्लॉक केले.

पोलीस असल्याचे सांगत चौकडीने 2.6 कोटींचे दागिने पळविले, हैदराबाद - सायन सर्कल ते भिवंडी पळवापळवी
मीरारोडमध्ये असे काय घडले?
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : दिल्ली क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगत सायन सर्कलला उतरलेल्या हैदराबादच्या एका ज्वेलर्स आणि त्याच्या कारागिरांच्या इनोवा कारला एका चौकडी घेरले. त्यांचे अपहरण करीत त्यांना भिंवडीला नेत त्यांच्याकडील दोन किलोचे सोने आणि हिरे असा 2.6 कोटींचा ऐवजही या चौकडीने भर दिवसा पळविल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली. या प्रकरणी मुंबई पोलीसांनी समांतर पथके स्थापन करुन तपास सुरू केला आहे.

हैदराबादचे ज्वेलर्स संतोष नरदी आणि त्यांच्यासाठी काम करणारे हरीराम घोटीया मुंबईला कच्चे सोने आणि हिरे घेऊन मुंबईत सायन सर्कलला खाजगी लक्झरी बसने उतरले. ते नेहमीच कच्चे सोने घेऊन हैदराबादहून मुंबईत येतात आणि दागिने तयार करून पुन्हा हैदराबादला नेत असतात.

जेव्हा हैदराबादचे हे कारागिर त्यांच्या क्लायंटकडे इनोवा कारमधून बीकेसीला भारत डायमंडकडे निघाले असता त्यांच्या इनोवा कारला दुसऱ्या कारने ब्लॉक केले. त्यावेळी त्या कारमधून दोघे जण उतरले आणि त्यांनी आपण दिल्ली क्राईम ब्रॅंचमधून आलो आहोत, आम्हाला तुमच्याकडील सामानाची झडती घ्यायची आहे असे त्यांनी सांगितले. घोटीया यांनी यात सोने असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी याची कागदपत्रे दाखवा अशी मागणी केली. आम्ही तुम्हाला दिल्ली घेऊन चाललो आहोत असे सांगत त्यांनी त्यांनी भिवंडीला नेले, तेथे त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील 2.6 कोटीचा मुद्देमाल घेऊन ते पसार झाले. या प्रकरणातील आरोपींना या ज्वेलर्सच्या सर्व घडामोडी माहीती असल्याने त्यांना ज्वेलर्सच्या ओळखीतल्या लोकांनीच टीप दिली असावी असा सायन पोलीसांना संशय आहे. त्यादृष्टीने या प्रकरणाचा तपास सुरू आहे.