Osman Hadi: अल्लाह उन्हें… उस्मान हादी याचा सिंगापूरमध्ये गेम, आता दुसरा नंबर कुणाचा? मुहम्मद युनूस सरकारचे लटपटले पाय
Osman Hadi Bangladesh: बांगलादेश अजूनही अस्वस्थ आहे. बांगलादेश दररोज जळत आहे. आता शेख हसीना यांची सत्ता उलथवण्यात सिंहाचा वाटा असलेला त्यांचा तरुण नेता उस्मान हादी याच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे युनूस सरकार टेन्शनमध्ये आले आहे.

Muhammad Yunus: बांगलादेशामध्ये गेल्या वर्षी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात हिंसक आंदोलन झाले. त्यात विरोधी नेता उस्मान हादी याचा सिंहाचा वाटा बोता. या 18 डिसेंबर 2025 रोजी सिंगापूरमध्ये गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली. गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याचा मृत्यू ओढावला. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार मुहम्मद युनूस यांनी त्याच्या निधनावर शोक संवेदना व्यक्त केला आहे. तर युनूस चांगलेच टेन्शनमध्ये आले आहेत. शेख हसीना यांचे सरकार उलथवण्यात परदेशी एजन्सीचा मोठा हातभार असल्याचे समोर आलेले आहे. काही विद्यार्थी नेते आणि संघटनांना हाताशी धरून बांगलादेशमध्ये सत्ता उलथवण्यात आली. आता ज्यांनी बंड केले, त्यातील पहिला बळी गेला आहे. त्यामुळे युनूस सरकार अजून कुणाकुणाचे बळी जातील यामुळे धास्तावले आहे.
अल्लाह त्यांना शांती देवो
मुहम्मद युनूसने हादी याच्या मृत्यूनंतर राष्ट्राला संबोधित केले. हादी समर्थकांनी बांगलादेशात सर्वच ठिकाणी जाळपोळ सुरु केली आहे. त्यांनी मीडिया हाऊस, पत्रकार आणि वृत्तपत्रांच्या कचेरींना टार्गेट केले आहे. बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला आहे. सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान इंकलाब मंचाचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी आपल्यात राहिले नाही. अल्लाह त्यांना शांती देवो अशी प्रार्थना आणि शोक संवेदना युनूस यांनी व्यक्त केली. सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विव्हियन बालाकृष्णन यांनी मला ही दुखद बातमी दिल्याचे ते म्हणाले. तो साम्राज्यवादाच्या विरोधातील अमर शिपाई होता असे युनूस म्हणाले.
हादीच्या मुलांची घेतली जबाबदारी
युनूस सरकारने सामूहिक प्रार्थना केली. शरीफ उस्मान हादी याच्या निधनानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली. उद्या, शनिवारी एक दिवसाचा शोक ही बांगलादेशमध्ये असेल. तर हादी याच्या एकुलत्या एक मुलाची जबाबदारी युनूस सरकारने घेतली आहे. शनिवारी राष्ट्रीय शोक असल्याने सर्वच सरकारी, निम्न सरकारी आणि इतर संस्थांवरील राष्ट्रध्वज हा अर्ध्यावर फडकवला जाईल.
आता दुसरा नंबर कुणाचा?
शेख हसीना यांचे सरकार गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये उलथवण्यात आले होते. विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांनी त्यासाठी मोलाची भूमिका निभावली होती. पण या बंडामुळे बांगलादेशावर कट्टरतावाद्यांचे वर्चस्व वाढले आहे. हिंदूंवर अत्याचार वाढले आहे. तर दुसरीकडे शेख हसीना यांचे कार्यकर्ते आणि वाचलेले नेते आता सक्रीय झाले आहेत. हादी याचा गेम कुणी केला हे स्पष्ट नसले तरी लवकरच बंडाला समर्थन देणाऱ्यांवर संकट येईल असे म्हटले जात आहे.
