Epstein Files: एपस्टिन फाईलचा पहिला दणका, जग हादरलं, भारतात संध्याकाळपर्यंत मोठ्या घडामोडी?
Epstein Files Release 2025: जेफ्री एपस्टीन याने तुरुंगात आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येतो. पण त्यापूर्वी त्याच्या ताब्यातील अनेकांची फोटो आणि खासगी माहिती यंत्रणांनी ताब्यात घेतली होती. ती माहिती आज 19 डिंसेबर रोजी सार्वजनिक करण्यात येणार आहे. त्यामुळे जगभरातील अनेक नेत्यांची झोप उडाली आहे.

Epstein Files 19 December 2025 Release: जगप्रसिद्ध जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडल प्रकरणातील सर्व गोपनीय माहिती आज सार्वजनिक करण्यात येणार आहे. 19 नोव्हेंबर 2025 रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयीच्या विधेयकावर स्वाक्षरी केली होती. त्यानुसार, 30 दिवसांत ही गोपनीय माहिती सार्वजनिक करण्याचे निश्चित झाले होते. आज 19 डिसेंबर रोजी ही माहिती जगासमोर येणार आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने हे रेकॉर्ड्स खुले करण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे जगभरातील नेत्यांमध्ये दहशत पसरली आहे. अनेक नेत्यांची झोप उडाली आहे.
अमेरिकेतील सर्वात मोठे सेक्स स्कँडल सध्या धुमाकूळ घालत आहे. अमेरिकन हाऊस ओव्हरसाईट समिती एपस्टीनशी संबंधित 23 हजार पानांचा अहवाल आणि फोटो सार्वजनिक करणार आहेत. त्यामुळेच अनेक देशात खळबळ उडाली आहे. कारण एपस्टीनचे वर्तुळ मोठे होते. सामजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात त्याचे मोठे वलय होते. तो या वलयातील काही जणांना मुली पुरवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. लहान मुलींना मसाजच्या नावाखाली समोर करत त्यांचे लैंगिक शोषण करण्यात येत असल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्यावरून अमेरिकेत वादळ उठले होते.
एका मुलीच्या धाडसाने सेक्स स्कँडल समोर
व्हर्जिनिया रॉबर्ट्स ग्युफ्रे या पीडितेने 2015 मध्ये आपलं शोषण करण्यात आल्याचा दावा करत कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हे सेक्स स्कँडल समोर आले. त्यात जेफ्री एपस्टीन आणि त्याचा साथीदार घिस्लेने मॅक्सवेल याच्याविरोधात एक मानहानीचा आणि शोषणासंबंधीचा कायदेशीर खटला चालविण्यात आला. मॅक्सवेल याला 2021 मध्ये सेक्स ट्रॅफिकिंगप्रकरणात 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. एपस्टीन फाईल हे एक कोर्ट डॉक्युमेंट्स आहेत. ते जानेवारी 2024 मध्ये सार्वजनिक करण्यात आले. या कागदपत्रांवरील गोपनियता हटवण्यात आली. या सार्वजनिक दस्तावेजात कायदेशीर युक्तीवाद, दावे-प्रतिदावे, पुरावे, ई-मेल्स यांच्यासह 95,000 फोटो आहेत. तर जगभरातील जवळपास 200 व्यक्तींची नावे आहेत. आता या सेक्स रॅकेटमध्ये त्यातील कुणाचा काय संबंध आहे, हे मात्र हा अहवाल आणि त्यातील पुराव्यावरूनच समोर येईल.
ट्रम्प यांच्याशी एपस्टीनचा घरोबा
खरंतर डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टीन हे एकमेकांचे खास मित्र होते. ट्रम्प राजकारणात येण्यापूर्वी या दोघांची घनिष्ठ मैत्री होते. दोघेही उद्योगपती आणि आर्थिक क्षेत्रात नावाजलेले होते. दोघे अनेकदा सार्वजनिकरित्या एकाच मंचावर आले होते. दोघांच्या कुटुंबियांचे सुद्धा घनिष्ठ संबंध असल्याचे जुन्या फोटोवरून स्पष्ट होते. पण या लैंगिक शोषण प्रकरणात अथवा ह्युमन ट्रॅफिंकिंगमध्ये काहीही संबंध असल्याचे सर्व आरोप आणि दावे डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळले आहेत.
सेक्स स्कँडल असं आले समोर?
2005 मध्ये फ्लोरिडा पोलिसांनी जेफ्री एपस्टीन याच्याविरोधात चौकशी आणि तपास सुरू केला होता. एका आई-वडिलांनी त्याच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यांच्या 14 वर्षीय मुलीचे एपस्टीनने लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांनी लावला होता. त्यानंतर तपासात एपस्टीनने 36 मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. या प्रकरणात 2008 मध्ये तो दोषी ठरला. त्याला 13 महिन्यांची शिक्षा झाली. तुरुंगातून बाहेर आल्यावरही त्याचे कारनामे थांबले नाही. 2015 मध्ये पुन्हा एक पीडिता समोर आली. जुलै 2019 मध्ये त्याला अटक करण्यात आली. ऑगस्ट 2019 मध्ये त्याने तुरुंगात आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला.
भारतातही हादरे?
Epstein Files चा हादरे भारतातही बसणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोनदा पत्रकार परिषद घेऊन केला आहे. देशाचा पंतप्रधान बदलणार असल्याचा दावा त्यांनी केला. तर मराठी माणूस देशाच्या पंतप्रधान पदी बसू शकतो असे मोठे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याने देशात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या मते या एपस्टीन फाईल्स प्रकरणात भारतातील दोन विद्यमान आणि एका माजी खासदाराचा समावेश आहे. त्यामुळे सध्याचे सरकार अडचणीत येऊ शकते,असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
