गावात चेकिंग सुरू आहे, अंगठी आणि पैसे जपून ठेवा, पोलिस असल्याचं भासवून वृद्ध नागरिकाला..

वृद्ध नागरिकांना बोलण्यात गुंतवून किंवा फसवून त्यांना लुटण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत खूप वाढल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना इगतपुरी शहरात घडली आहे. या शहरात दोन भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून एक वृद्ध नागरिकाची फसवणूक केली. यामुळे शहरात खळबळ माजली आहे.

गावात चेकिंग सुरू आहे, अंगठी आणि पैसे जपून ठेवा,  पोलिस असल्याचं भासवून वृद्ध नागरिकाला..
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 9:16 AM

वृद्ध नागरिकांना बोलण्यात गुंतवून किंवा फसवून त्यांना लुटण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत खूप वाढल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना इगतपुरी शहरात घडली आहे. या शहरात दोन भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून एक वृद्ध नागरिकाची फसवणूक केली. यामुळे शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात संबंधित २ भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य स्रोत वापरून कसून तपास सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण ?

इगतपुरी शहरातील राममंदिर भागात ७१ वर्षीय जेष्ठ नागरिकाला पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करण्यात आली आहे. इगतपुरी येथील श्याम मुलचंद पुरोहित (वय ७१) हे राममंदिर परिसरात एक भामट्याने त्यांच्यशी बोलायला सुरूवात केली. मी पोलिसांत असून माझं नाव शिंदे असं त्याने सांगितलं. पुढे गावात चेकिंग चालू आहे. तुम्ही तुमच्या हातातील अंगठी व पैसे असतील तर काढून सुरक्षित ठेवा असे सांगितले. त्याचवेळी तेथे एक दुसरा इस (भामटा) आला आणि तोही त्या वृद्ध नागरिकाशी बोलू लागला. ते साहेब आहेत, आपल्याला फसविणार नाही असे सांगत विश्वास संपादन केला.

पहिल्या भामट्याने अंगठी व पैसे सुरक्षित ठेवल्याचे भासवून रुमालात बांधल्याचे नाटक केले. आण काही कळायच्या आतच तो ऐवज घेऊन हे दोन्ही भामटे पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्याम पुरोहित यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात जाऊन २ भामट्यांच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य स्रोत वापरून कसून तपास सुरु केला आहे. हळूहळू वाढत चालेल्या गुन्हेगारीला इगतपुरी पोलिसांनी आळा घालावा अशी मागणी जेष्ठ नागरिकांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.