दिल्लीच्या ठगांनी मुंबईसह या शहरातल्या लोकांना ऑनलाईन लुबाडले, पेटीएमच्या माजी कर्मचाऱ्याचा चायनाच्या मदतीने 200 कोटींचा घोटाळा

| Updated on: Jan 28, 2023 | 9:56 AM

इंन्स्टाग्रामवर 'वर्क फ्रॉम होम' द्वारे घरबसल्या दिवसाला पंधरा हजार कमविण्याची जाहीरात देत दिल्लीच्या या ठगांनी मुंबईसह देशभरातील 30 हजार जणांना सुमारे 200 कोटींचा गंडा घातला आहे.

दिल्लीच्या ठगांनी मुंबईसह या शहरातल्या लोकांना ऑनलाईन लुबाडले, पेटीएमच्या माजी कर्मचाऱ्याचा चायनाच्या मदतीने 200 कोटींचा घोटाळा
delhi scam
Image Credit source: socialmedia
Follow us on

दिल्ली : तुम्ही जर ‘घरी बसून अमूक रक्कम कमवा’ अशा आमिष दाखविणाऱ्या जाहीरातींना भूलूत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कोणताही शॉर्टकट नेहमी धोकादायकच असतो. झटपट श्रीमंत होण्याच्या नादाने भुललेल्यांचा फायदा घेणारा असाच एक तब्बल दोनशे कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. दिल्लीच्या सुशिक्षित ठगांनी या घोटाळ्यासाठी वापरलेल्या वेबसाईट चीनमधील असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच दुबईमध्ये फायनान्सियल ट्रांझक्शन झाल्याचे उघडकीस आले आहे.

ई कॉमर्स साईटवर ‘वर्क फ्रॉम होम’ ची जाहीरात देऊन दिल्लीतल्या एका ठगांच्या टोळीने सुमारे 200 कोटींचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीचा भंडाफोड दिल्ली पोलीसांनी केला आहे. विशेष म्हणजे या टोळीने तीस हजार जणांना ठगवल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणात दिल्ली पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांनी या घोटाळ्यासाठी वापरलेल्या वेबसाईट चीनमधील असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच दुबईमध्ये फायनान्सियल ट्रांझक्शन झाल्याचे उघडकीस आले आहे.

गेल्यावर्षी 26 सप्टेंबर महिन्यात एका महिलेने आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलीसांना केली होती, त्याचा तपास करताना दिल्ली पोलीसांनी हा दोनशे कोटींचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले. या महिलेने इंन्स्टाग्रामवर ‘वर्क फ्रॉम होम’ द्वारे घरबसल्या दिवसाला पंधरा हजार कमविण्याची संधी देत असल्याची जाहीरात पाहिली आणि रजिस्ट्रेशन केले. या वेबसाईटवर ऑनलाईन स्टोअरचा सेल वाढविण्याची असाईनमेंट या महिलेला देण्यात आली. वेबसाईटवर तिच्या वॉलेटमध्ये पैसे जमा होत असल्याचे दिसत होते, परंतू तिला काही वस्तूही डिस्काऊंट मिळत असल्याने विकत घ्याव्यात असे त्या एम्लॉयरने अट टाकत सांगितले. त्या महिलेने विविध वेळी तब्बल 1.2 लाख रूपये खर्च केले. त्यानंतर तिच्या लक्षात आले की तिच्या वॉलेटमध्ये काहीच शिल्लक नाही.

या प्रकरणात नोव्हेंबरमध्ये दिल्ली सायबर पोलीस ठाण्याचे एसीपी यशपाल सिंह यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर या वेबसाईटचा टेलिग्राम आयडी चीनच्या बिजींगमधला तर व्हॉट्सअप नंबरही परदेशातील असल्याचे समजले. बँकेचे ट्रांक्झशन डीटेल्स शोधले असता या महिलेने भरलेले पैसे शेल कंपन्यात गुंतवल्याचे उघडकीस आले. दर दिवसाला या वेबसाईटच्या ट्रांक्झशन अकाऊंटला 5.2 कोटी जमा होत होते.

पेटीएमच्या माजी कर्मचारी सामील

या घोटाळ्यात तिघांना आतापर्यंत दिल्ली पोलीसांनी अटक केली असून त्यात पेटीएम कंपनीचा एक माजी डेप्युटी मॅनेजरचाही समावेश आहे. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार जॉर्जियात असून या गँगची लिंक मुंबई, हरीयाना, दिल्ली आणि पंजाबमध्ये आहे. या प्रकरणात अभिषेक गर्ग, सतीश यादव आणि संदीप महाला या तिघांच्या मुसक्या आवळल्या असल्याचे वृत्त टाईम्स दिले आहे.

मुंबईशी गँगचे कनेक्शन

घोटाळ्यातील जॉर्जियातील मुख्य सूत्रधाराला अभिषेक गर्ग हा टेक्नीकल सपोर्ट देत असल्याचे उघडकीस आले आहे. सतीश यादव हा दिल्ली विद्यापीठाचा पदवीधर आहे. तो मोबाईल कंपनीत काम करीत होता. घोटाळ्यातील रक्कम क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातही वापरल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्याचा तपास सुरूच असून पोलीसांनी कोणत्याही आमीष दाखवणाऱ्या जाहीरातींना भूलु नये असे आवाहन केले आहे.