
कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातून चोरीची एक घटना समोर आली आहे, जी जाणून तुम्ही थक्क व्हाल. तेथे चोरट्यांनी अवघ्या 33 सेकंदात 33 लाख रुपयांची चोरी केली. हे प्रकरण बसवेश्वर नगरचे आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, या चोरीप्रकरणी हावेरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरंतर, चोरट्यांनी घरासमोर उभ्या असलेल्या कारची काच फोडून 33 सेकंदात कारमधील 33 लाख रुपये चोरून पळ काढला. ही घटना बसवेश्वर नगर येथील संतोष हिरेमठ याच्यासोबत घडली, त्यांचे पैसे चोरीला गेले.सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर संतोषने याने दैनंदिन व्यवहारासाठी युनियन बँक ऑफ इंडिया, हावेरी येथून चेकद्वारे ३३ लाख रुपये काढले होते आणि ते पैसे गाडीच्या मागील सीटवर ठेवले होते.
चोरी सीसीटीव्हीत कैद
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 4च्या सुमारास संतोषने घरासमोर कार उभी केली होती, मात्र तो ते पैसे गाडीत ठेवूनच आत गेला. मात्र संध्याकाळी जेव्हा तो परत बाहेर आला तेव्हा त्याच्या कारच्या खिडकीची काच फोडून ती उद्ध्वस्त झाल्याचे आणि गाडीतील पैसे चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आलं.त्यानंतर आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरेही तपासण्यात आले. चोरीची ती संपूर्ण सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.
कारची खिड़की फोडून लाखो लांबवले
चार चोर दोन दुचाकींवर आल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेल्या व्हिडीओमध्ये दिसले, त्यानंतर एकजण गाडीजवळ पोहोचला. कारची खिडकी फोडून त्याने आतमध्येप्रवेश केला. आजूबाजूला पहातच त्याने कारमधील पैशांनी भरलेली बॅग उचलली. त्यानंतर बाईकवरील इतर व्यक्तींसोबत बसून त्याने तेथून पळ काढला. अवघ्या काही सेकंदात त्याने लाखो रुपये लांबवले.
पोलिसांत गुन्हा दाखल
या चोरीची माहिती मिळताच एसपी आणि अतिरिक्त एसपी घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीया संदर्भात हावेरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत, असे एसपी अंशुकुमार यांनी सांगितले. मात्र यामुळे मोठी खळबळ माजली आहे.