Nashik| दारूड्या मुलाने आईला ढकलले, 65 वर्षीय वृद्धा झोपेतच गतप्राण; चटका लावणारी घटना…

सकाळी दारूची नशा उतरल्यानंतर प्रशांतला जाग आली. तर अजून आई उठलेली नव्हती. त्यामुळे तो चहा करण्यासाठी म्हणून आईला उठवायला गेला. मात्र, आवाज देऊनही आई उठली नाही.

Nashik| दारूड्या मुलाने आईला ढकलले, 65 वर्षीय वृद्धा झोपेतच गतप्राण; चटका लावणारी घटना...
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 12:10 PM

नाशिकः आई आपल्या मुलाच्या भल्यासाठी कधी-कधी त्याच्यावर हात उगारते. मात्र, त्याला हेच सहन झाले नाही. त्यामुळे चिडून दारूड्या मुलाने आपल्या 65 वर्षीय वृद्ध आईला ढकलले. ती अगोदर गेटवर आदळली आणि त्यानंतर फरशीवर पडली. या जखमेमुळे आईच्या डोक्यातून रात्रभर रक्तस्त्राव झाला आणि तिचा झोपेतच मृत्यू झाल्याची ह्रदद्रावक घटना नाशिकमध्ये घडली आहे. विमल कचरू पवार, असे मृत वृद्धेचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी दारूड्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत.

अशी घडली घटना

दिंडोरी रोडवर मेरी शासकीय वसाहत आहे. या वसाहतीत प्रशांत पवार आणि विमल पवार हे रहायचे. विमल पवार सेवानिवृत्त आहेत. मुलगाही सुशिक्षित आहे. मात्र, नोकरी नसल्याने तो बेकार आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. गुरुवारी रात्रीही प्रशांत घरी दारू पिऊन आला. त्यावेळी आई रागावली. या रागाच्या भरातच तिने प्रशांतला दारू पिऊ नको, असे सुनावून एक चापट मारली. त्यामुळे दारूच्या नशेतच प्रशांतने आईला ढकलले. त्यामुळे विमलबाई अगोदर गेटवर आदळल्या. त्यानंतर फरशीवर पडल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. नशेत असलेल्या प्रशांतला हे समजलेच नाही. शिवाय आईनेही रागाच्या भरात तिकडे दुर्लक्ष केले.

झोपलेल्या जागीच मृत्यू

माय-लेकरांचे हे भांडण झाल्यानंतर दोघेही झोपायला गेले. सकाळी दारूची नशा उतरल्यानंतर प्रशांतला जाग आली. तर अजून आई उठलेली नव्हती. त्यामुळे तो चहा करण्यासाठी म्हणून आईला उठवायला गेला. मात्र, आवाज देऊनही आई उठली नाही. विमलबाई रात्री पडल्यानंतर तशाच झोपी गेल्या. त्या जखमेतून रात्रभर रक्तस्त्राव झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. प्रशांतला आपल्या आईचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याने म्हसरूळ पोलीस ठाण्यात हजेरी लावून सारा प्रकार सांगितला. तेव्हा सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावित, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, अशोक साखरे यांनी घटनास्थळी भेट दिली. ही घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. त्यामुळे आरोपी प्रशांतला पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

इतर बातम्याः

scam: आदिवासी महामंडळ नोकरभरती घोटाळ्यात 2 बड्या अधिकाऱ्यांवर 5 वर्षांनी गुन्हा, राजकीय पदाधिकाऱ्याला अभय

ST Strike: मेस्मा लावण्याची धमकी म्हणजे मुघलशाही, पडळकरांची परबांवर टीका; करोडोंच्या जमिनीवर डोळा असल्याचा आरोप

Special Report: जीवन नशीलं, राज्यसत्ता कारस्थान अन् राज्य लोकांना भ्रष्ट करणारं षडयंत्र; सत्य उच्चारून श्वास सोडणाऱ्या ‘लिओ’ची चित्तरकथा!