Video : बिहारमधील स्फोटात तीन मजली इमारत जमीनदोस्त, 7 जणांचा मृत्यू, बॉम्ब तयार करीत असल्याचा संशय

| Updated on: Mar 04, 2022 | 10:07 AM

अचानक झालेल्या स्फोटात परिसरातील अनेक नागरिक घाबरले आहेत. तिथं अनेकांना बॉम्ब बनवत असल्याचा संशय पूर्वीपासून होता. त्या इमारतीमध्ये अनेक लोक काम करत होती. स्फोट ज्यावेळी झाला त्यावेळी तिथं किती लोक होती हे अद्याप निश्चित झाले नसल्याने जमीनदोस्त झालेल्या इमारतीमध्ये अजून कोणी अडकलंय का याचा तारापूर पोलिस शोध घेत आहे.

Video : बिहारमधील स्फोटात तीन मजली इमारत जमीनदोस्त, 7 जणांचा मृत्यू, बॉम्ब तयार करीत असल्याचा संशय
जमीनदोस्त झालेली इमारत
Image Credit source: ANI
Follow us on

बिहारमध्ये (bihar) एक दुर्देवी घडल्याचे नुकतेच उजेडात आले, बिहारमधील भागलपूरमध्ये (bhagalpur) गुरूवारी एक स्फोट झाला. त्यामध्ये एक तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली असून या दुर्घटने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी तारापूर पोलिसांनी (tarapur police) पोहचले असून इमारत कोसळेला भाग तिथून काढण्याचं काम जेसीबीच्या साहाय्याने सुरू आहे. ढिगा-याखाली आणखी कोणी अडकले आहे का ? याची पाहणी पोलिसांकडून घटनास्थळी सुरू आहे. अनेक ढिगा-यात अडकले असल्याची पोलिसांनी भिती असल्याने त्या अनुशंगाने मदत कार्य सुरू आहे. इमारतीत बॉम्ब तयार करीत असल्याचा परिसरातल्या अनेकांना संशय होता.

अनाथाश्रमाजवळ स्फोट

ही घटना भागलपूरमधील काजवलीजक परिसरात झाली असून ज्या इमारतीमध्ये हा स्फोट झाला तिथून काही अंतरावरती अनाथाश्रम आहे. ही घटना अनाथाश्रमापासून 100 मीटर परिसरात घडली असून बॉम्ब स्फोटामुळे इमारत कोसळली असल्याचा अनेकांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला असून त्या अनुशंगाने तपास करणार असल्याचे समजते. त्या परिसरात पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी त्यांना तिथं दारूगोळा आणि अवैध फटाके आणि देशी बॉम्बच्या साह्याने स्फोट झाल्याची बाब समोर आली आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे तपास केल्यानंतर उजेडात येईल अशी माहिती भागलपूरचे डीआईजी सुजीत कुमार यांनी सांगितली. तसेच भागलपूर भागात बॉम्बस्फोटाच्या घटना वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आल्याचे प्रति शेखर यांनी सांगितले आहे.

स्फोटाने परिसर हादरला

अचानक झालेल्या स्फोटात परिसरातील अनेक नागरिक घाबरले आहेत. तिथं अनेकांना बॉम्ब बनवत असल्याचा संशय पूर्वीपासून होता. त्या इमारतीमध्ये अनेक लोक काम करत होती. स्फोट ज्यावेळी झाला त्यावेळी तिथं किती लोक होती हे अद्याप निश्चित झाले नसल्याने जमीनदोस्त झालेल्या इमारतीमध्ये अजून कोणी अडकलंय का याचा तारापूर पोलिस शोध घेत आहे. घटनास्थळी असलेला ढिगारा पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने काढत आहेत. तिथं अनेक तपास यंत्रणा बोलावून तपास करण्यात येणार त्यामुळे परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथं त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. नेमका स्फोट कशामुळे झाला याची पोलिस चौकशी करणार असल्याचं समजतंय.

Russia Ukraine War Video: यूरोपातल्या सर्वात मोठ्या अणूऊर्जा केंद्रावर रशियाचे हल्ले, जगावरचं आण्विक संकट पुन्हा गडद, विनाशाच्या उंबरठ्यावर?

HSC Exam 2022 : ऑनलाईन धडे घेतलेल्या 12 वीच्या विद्यार्थ्यांची आज पासून ऑफलाईन परीक्षा, 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी देणार परीक्षा

Maharashtra News Live Update : HSC Exam 2022 : ऑनलाईन धडे घेतलेल्या 12 वीच्या विद्यार्थ्यांची आज पासून ऑफलाईन परीक्षा, 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी देणार परीक्षा