Maharashtra News Live Update : दापोडी रेल्वे स्टेशन सिग्नल यंत्रणेला आग, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेसेवेवर परिणाम

| Updated on: Mar 04, 2022 | 10:55 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : दापोडी रेल्वे स्टेशन सिग्नल यंत्रणेला आग, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेसेवेवर परिणाम
Image Credit source: tv9

मुंबई : आज शुक्रवार 4 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. आज बारावीची ऑफलाईन परीक्षा आहे, एसटीचा संप असल्याने विद्यार्थांना मोठी कसरत करावी लागेल, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा म्हणून विधानभवनात गोंधळ घातला. विधानभवनात राज्यपालांनी काही मिनिटात अभिभाषण आटोपल्याने राज्य मंत्रिमंडळाने निषेध करून नापसंती व्यक्त करणारे पत्र राष्ट्रपतींना पाठविण्याचा निर्णय घेतला. या सर्व घटकांच्या बातम्या आपण दिवसभरात पाहणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Mar 2022 08:34 PM (IST)

    दापोडी रेल्वे स्टेशन येथे सिग्नल यंत्रणा असलेली रीले रूम मध्ये

    दापोडी रेल्वे स्टेशन येथे सिग्नल यंत्रणा असलेली रीले रूम मध्ये आग लागल्याने पुणे ते लोणावळा दरम्यानच्या ट्रेन रद्द, पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम

  • 04 Mar 2022 07:55 PM (IST)

    संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप, रश्मी शुक्ला यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा

    पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. फोन टॅपिंगच्या आरोपाखाली रस्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अ‌ॅक्ट खाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन 2019 मध्ये टॅप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅप झाल्याचा एफआयर मध्ये उल्लेख आहे.

  • 04 Mar 2022 07:17 PM (IST)

    ओबीसी आरक्षणासाठी सरकार 2 विधेयके मांडणार: छगन भुजबळ

    मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन प्रस्ताव आले होते. ते विधानमंडळापुढं मांडायचे आहेत आणि त्याचं कायद्यात रुपातंर करायचं आहे. एक ग्रामविकास आणि नगरविकास विभागाचे आहेत. पूर्वी आपल्याकडे प्रभाग पाडायचे, आरक्षण ठरवायचे अधिकार होते. निवडणूक घेण्याचं काम आयोग करत होता. काही वर्षांपूर्वी ते अधिकार आयोगाकडे देण्यात आले होते. प्रभाग तयार करणे आणि संरचना बदलणं ही कामं शासन करील. डाटा निवडणूक आयोगाला देईल. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड प्रमाण कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.

    नवीन प्रभाग तयार करण, लोकसंख्येच्या दृष्टीनं रचना आणि आरक्षण यासारखी कामं राज्य सरकारकडे येईल. सगळी संरचना झाल्यावर ते निवडणूक आयोगाला देईल, त्याप्रमाणं निवडणूक घ्यायची आहे.

    विधानसभेत मी आजपण म्हणालो. मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मध्य प्रदेशनं कसा मार्ग काढला. मध्य प्रदेशनं अध्यादेश काढला आणि त्यांनी वाट शोधली. त्यांनी डाटा तयार करण्याचं काम सुरु केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश सारखं करताना काही अडचण नाही,  असं सांगितल्याचं छगन भुजबळ म्हणाले.

  • 04 Mar 2022 07:04 PM (IST)

    ओबीसी आरक्षणावरून राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत चर्चा

    ओबीसी आरक्षणावरून राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत चर्चा

    इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी काही नियम आहेत. गावात जाऊन डेटा जमा होत नाही. आरक्षणासह निवडणुकांसाठी मध्यप्रदेशच्या धर्तीवर कायदा करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न

    ओबीसी विधेयक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेऊन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू

  • 04 Mar 2022 06:59 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नये, गोपीचंद पडळखर यांचं आवाहन

    सोमवारी राज्यसरकार कडून काय भूमिका येते आपण आयकून घेऊ

    तुम्ही आत्महत्या करू नये आत्महत्या करुन मार्ग निघत नाही

    कामावर हजर झाला ननंतर काही कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली

    एका बाजू सरकार सांगत आहे तूम्ही कामावर हजर होवा आणि दुसरीकडे कारवाई होत आहे

    आम्ही कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे

    ज्या दिवशी आम्ही सरकार शी चर्चा केलं त्या दिवशी आम्ही बाहेर पडलो

  • 04 Mar 2022 06:00 PM (IST)

    राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीला थोड्याच वेळात मंत्रालयात सुरुवात

    राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीला थोड्याच वेळात मंत्रालयात सुरुवात

    मुख्यमंत्री या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत, तर इतर मंत्रीगण प्रत्यक्ष हजर राहणार आहेत

    मंत्रिमंडळ बैठकितील विषय

    १). महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मधील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या रचनेविषयी सुधारणा करण्याबाबत.

    २). मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्याबाबत.

  • 04 Mar 2022 05:25 PM (IST)

    नरेंद्र मोदींच्या दौऱ्याअगोदर काँग्रेसकडून बॅनरबाजी, गो बॅक मोदी आशयाचे बॅनर्स लावले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याआधीच काँग्रेसकडून बॅनरबाजी,

    - भवानी पेठ, डेक्कन परिसरात काँग्रेसने लावलेत गो बॅक मोदी या आशयाचे बॅनर्स,

    - येत्या सहा मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे शहर दौऱ्यावर येत आहेत.

    - या दौऱ्याला काँग्रेसकडून विरोध दर्शविण्यात आलाय.

  • 04 Mar 2022 04:46 PM (IST)

    नवाब मलिक यांना त्या जागेचं एक कोटी भाडे येत : देवेंद्र फडणवीस

    9 तारखेला मोर्चा काढायचा आहे ज्या लोकांनी मुंबईच्या जनते बरोबर खेळी केली त्यांच्या विरोधात मोर्चा असणार

    तीन एकराची जागा नवाब मलिक यांनी मुंबई मध्ये बॉम्ब फोडणाऱ्या कडून खरेदी केला

    दाऊद बाहेर गेल्या नंतर रियल इस्टेट मधून पैसे घ्याचे आणि मुंबई मध्ये बॉम्बस्फोट घडवायचे

    नवाब मलिकांनी 15 हजार स्क्वेअर फुट दरानं जमीन घेतली

  • 04 Mar 2022 04:44 PM (IST)

    मागासवर्गीय आयोगाला इम्पेरिकल डाटा तयार करण्याचं काम दिलं : विजय वडेट्टीवार

    मागासवर्गीय आयोगाला इम्पेरिकल डाटा तयार करण्याचं काम देण्यात आलं

    राज्यातील राजकीय पक्षांशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना आयोगात घेतलं

  • 04 Mar 2022 04:21 PM (IST)

    नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप मोर्चा काढणार

    भाजपा कडून अल्पसंख्याक मंत्री, नवाब मलिक यांना मंत्रीपदातून हटवण्याकरिता मोर्चासाठी तयारी बैठकीचा आयोजन.

    बैठकीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन.

    मुंबईतील के.सी.कॉलेज हॉलमध्ये बैठकीचा आयोजन.

  • 04 Mar 2022 04:12 PM (IST)

    राज्यपालांशी सकारात्मक चर्चा झाली, ते निर्णय घेतील : एकनाथ शिंदे

    एकनाथ शिंदे

    राज्यपालांशी सकारात्मक चर्चा झाली

    राज्यपाल  निर्णय घेतील

    12 आमदार आहेत, लोकशाहीत बहुमताच्या सरकारच्या निर्णयांचं महत्त्व असतं

    विधानपरिषदेच्या 12 आमदारांना संधी द्यावी

    विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत परवानगी देतील

    छगन भुजबळ

    राज्यपाल देतील त्या तारखेला निवडणूक घेऊ

    9 मार्चला विधानसभा अध्यक्ष निवडणूक प्रस्तावित

    पत्र आलं असेल ते मागं टाका

    12 आमदारांची फाईल मार्गी लावा आणि  विधानसभा अध्यक्षांची निवड मार्गी लावा, अशी विनंती केली.

  • 04 Mar 2022 03:46 PM (IST)

    अंबाबाई मंदिरातील नियम शिथिल

    अंबाबाई मंदिरातील नियम शिथिल

    अंबाबाई देवीच्या भक्तांसाठी खुशखबर

    लहान मुलांना देखील अंबाबाई देवीच दर्शन करता येणार.

    देवीच्या दर्शनासाठी ई पास मात्र बंधनकारक

    मुख दर्शनासाठी देखील ई पासची सक्ती.

    गाभारा दर्शन आणि मुख दर्शनासाठी वेगवेगळी रांग असेल..

  • 04 Mar 2022 03:23 PM (IST)

    राज्यपालांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ पोहोचलं

    राज्यपालांच्या भेटीसाठी छगन भुजबळ अनिल परब दाखल

    विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत चर्चेची शक्यता

    या अधिवेशनात निवडणूक घेण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इथं दाखल

    उपमुख्यमंत्री अजित पवार जयत पाटील आणि अशोक चव्हाण राजभवन

  • 04 Mar 2022 03:14 PM (IST)

    पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये सुरू झालेली गळती सुरूच

    -महापालिका निवडणुकीच्या पूर्वी भाजपमध्ये सुरू झालेली गळती सुरूच

    -पिंपरी चिंचवड मधील थेरगाव भागाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजप च्या नगरसेविका माया बारणे यांनी आज पक्षाचा राजीनामा दिलाय

    -आता पर्यंत भाजप च्या चार नगरसेवकांनी राजीनामा दिलाय

    -या पूर्वी भाजप चे नगरसेवक वसंत बोराटे, चंदा लोखंडे आणि तुषार कामठे यांनी या पूर्वी राजीनामा दिला होता भाजप च्या भ्रष्टाचाराला कंटाळून राजीनामा दिल्याचे माया बारणे यांनी स्पष्ट केलंय

  • 04 Mar 2022 02:48 PM (IST)

    फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना दिलासा, 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश

    - फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना दिलासा,

    - 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना उच्च न्यायालयाचे निर्देश,

    - फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

    - दाखल एफआयार रद्द करण्यासाठी शुक्ला यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती

  • 04 Mar 2022 02:11 PM (IST)

    शहर बस सेवा मेट्रोने चालवावी असा प्रयत्न सुरू आहे - नितीन गडकरी

    नगर सेवकांचा आज महापालिकेतील शेवटचा दिवस आहे .. मात्र पुन्हा आपल्याला यायचं आहे

    राजनीती बुलेट ट्रेन प्रमाणे आहे लोकांची गर्दी होते आणि ती खाली होते पुन्हा भरते

    हेच लोक पुन्हा निवडून आले तर जे आमच्या घरी चकरा मारत आहे त्यांचं काय होणार त्यांना तिकीट कसं मिळणार

    पण सगळ्यांनी चांगलं काम केलं त्यांना शुभेछ्या

    मी लोकसभेत बोलताना उभं होतो तेव्ह सगळ्या पार्टी चे लोकं मला अभिनंद करतात मी त्यांना गमतीत म्हणतो माझी श्रद्धांजली सभा आहे का ..तुमचंकाम चांगलं असेल तर सगळे तुमच्या सोबत असते

    नगर सेवकांचा काम सगळ्यात कठीण असते कारण प्रत्येक जण आपलं काम त्याच्या कडे घेऊन जातात

    सगळ्यांनी केलेल्या कामाला शुभेछ्या देतो आणि देवाला प्रार्थना करतो की तुम्हाला पुन्हा तिकीट मिळो ..

    सत्यनारायण नुवाल यांनी खूप मोठं काम देशासाठी केली त्यांचं मोठं संशोधन केले आहे ..

    नागपूर ची मेट्रो जगातील उदाहरण देणारी मेट्रो आहे .. पुण्यात सुद्धा चांगली मेट्रो उभारण्यात आली ..

    शहर बस सेवा मेट्रो ने चालवावी असा प्रयत्न सुरू आहे

    हवेत उडणारी बस नागपुरात चालविण्याच माझं स्वप्न आहे त्याची तयारी सुरू करा मी त्या साठी पैसे आणतो , त्याच मंत्रालय माझ्या कडे आहे ..

    मला एका पत्रकाराने विचारलं सरकार मध्ये चांगले काम कोणते आणि वाईट काम कोणते ...यावर मी सांगितलं सरकार मध्ये चांगल्या कामाला सन्मान मिळत नाही ...आणि वाईट काम करणाऱ्याला सजा मिळत नाही इथे सगळे बरोबरच असते

    तुम्हाला तिकीट मिळणार की नाही हे मी सांगू शकत नाही कारण मी तिकीट देत नाही .. मी सर्व्ह करतो ज्याला जनता म्हणेल त्याला तिकीट दिली जाते

  • 04 Mar 2022 02:10 PM (IST)

    विलीनीकरणाची मागणी अमान्य, अनिल परब यांची माहिती

    8 नोव्हेंबर 2021 रोजी उच्च न्यायालयानं त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीला एसटीच्या विलिनीकरणावर निर्णय घेण्यास सांगितला होता. 12 आठवड्यात तो अहवाल तयार करायचा होता. त्रिसदस्यीय समितीनं यानंतर तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला. त्यानंतर तो हायकोर्टात गेला. आर्थिक बाबी असल्यानं अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यास सांगितला होता. त्यानंतर मंत्रिमंडळात तो मांडला गेला. आता अहवाल विधिमंडळात मांडण्यात आला.

    एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी अमान्य करण्यात आलीय

  • 04 Mar 2022 02:10 PM (IST)

    एसटी आंदोलकांची संजय राऊतांवर टीका.

    - सरकरकडून यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो, अहवाल निगेटिव्हच येणार होता,

    - यापुढे आंदोलन अजून तीव्र करण्याचा आंदोलकांचा सरकारला इशारा,

    - यापुढे आता आम्ही सरकारकडे इच्छा मरणाची मागणी करणार,

    - संजय राऊतांना नवाब मलिकांच्या घरी जाण्यास वेळ आहे, मात्र आमच्या शहिद बाधवांच्या घरी जाण्यास त्यांना वेळ नाही,

    - एसटी आंदोलकांची संजय राऊतांवर टीका.

  • 04 Mar 2022 01:35 PM (IST)

    सरकार एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे - सुनिल प्रभू

    शिवसेना विधीमंडळाच्या कामकाजात घडत असलेल्या कामकाजात बॅकफूटवर नाही

    नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर भाजपने झिरवळ यांची दाखवलेली सही जाणीवपूर्वक खोडसाळपणा केलेला प्रकार आहे

    एसटी कर्मचाऱ्यांचा परिवहन मंत्री यांनी त्रिसदसयी अहवाल सभागृहात पटलावर ठेवलाय

    सरकार एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे

  • 04 Mar 2022 01:03 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणं शक्य नाही

    एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणं शक्य नाही

    सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणं शक्य नाही

    महामंडळाचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय शासनामार्फत करणे शक्य नाही

    महामंडळाच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेऊन पुढील मदतीबाबत निर्णय घेण्यात यावा

    महामंडळाचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय शासनामार्फत करणे शक्य नाही

    महामंडळाच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेऊन पुढील मदतीबाबत निर्णय घेण्यात यावा

  • 04 Mar 2022 12:32 PM (IST)

    सोलापूर विद्यापीठासमोर राज्यपालांना काळे झेंडे दाखवले

    सोलापूर - विद्यापीठ समोर राज्यपालांना काळे झेंडे दाखवले

    राज्यपालांचा ताफा जात असतां महामार्गावर आडवे येऊन दोन ते तीन जणांनी दाखवले काळे झेंडे

    जय शिवराय, जय ज्योती जय क्रांती च्या घोषणा

    छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांचे बद्दल वक्तव्य विरोध

  • 04 Mar 2022 12:31 PM (IST)

    राज्य सरकार युत्रेनहून राज्यात परतलेल्यांना मानसिक आधार देत आहे - अमित देशमुख

    राज्य सरकार युत्रेनहून राज्यात परतलेल्यांना मानसिक आधार देत आहे,

    जे मेडीकलचे विद्यार्थी युक्रेनमधून भारतात परतलेयत, त्यांच्या शिक्षणाबद्दल विद्यापिठाकडून राज्यसरकारने अवलोकन करून अहवाल मागवला आहे… या विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं होणार, आधार कसा मिळेल यासाठी युत्रेनच्या विद्यापिठाशी संपर्क करण्याच्या युचना दिल्यायत

    भारत सरकारला या सुचना देण्यात येतील , नॅशनल मेडीकल काऊंसिलक, मेडीकल संचालनालय संयुक्त कार्यक्रम जारी करू…

    - विद्यापिठाला या संदर्भात अहवाल सादर करण्यास सांगितलाय, पावकांशी विद्यार्थ्यांनी संवाद पुरेण होत नाही तोपर्यंत बोलणं योग्य ठरणार नाही…

    - सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहेत, विद्यार्थी नैराश्यातमजाणार नाही याची दखल घेणार…

    - परिक्षा आॅफलाईन पद्धतीने होत आहेत,

    - विरोधक टांनी शत्रूत्व पाळायचं की नाही याचा विचार करायला हवा…

  • 04 Mar 2022 11:32 AM (IST)

    इम्पिरिकल डेटा तुम्ही दिला नाही - छगन भूजबळ

    इम्पिरिकल डेटा तुम्ही दिला नाही.. पाच वर्ष तुम्ही काही उत्तर दिलं नाही.. इम्पिरिकल डाटा मागूनही दिला नाही.. त्यामुळे याची जबाबदारी आमच्यापेक्षा तुमची आणि मोदी सरकारची जास्त आहे.

  • 04 Mar 2022 11:31 AM (IST)

    तुमच्यासारखा समजूतदार नेता असताना यात काय अडचण येईल, असं मला वाटत नाही..

    काही नगरपालिका ओव्हरड्यू झाल्यात... झेडपी एकही ओव्हरड्यू झालेली नाही.. फडणवीसची तुम्ही दोघं तिघं.. आमच्याकडे एखादं दोन लोकं... मिळून यावर काम करुयात...

    काही गोष्टी राहून गेल्या, मी मान्यही केल्या. टेक्निकल गोष्ट राहून गेल्या तारीख वगैरे.. मी मान्य करतो... आदर करतो सुप्रीम कोर्टाचा..

    आम्ही सभागृहात एकमेकांवर चिखलफेक करणार नाही, उणीधुणी करणार नाही,, देशाला दाखवून देऊया आपण ओबीसी आरक्षणासाठी एक आहोत, असं दाखवू देऊ...

    तुमच्यासारखा समजूतदार नेता असताना यात काय अडचण येईल, असं मला वाटत नाही..

    एकमेकांमध्ये दूरी निर्माण करण्याऐवजी, भांडणं करण्याऐवजी, एकत्र येऊया आणि सोडवूया हा विषय...

    कोण कुठं काय काय बोललं हे सगळं आहे माझ्याकडे.. पण मला असं वाटतं की आपण शांतपणे बसून यावर मार्ग काढला पाहिजे... केवळ दुरावा निर्माण करण्याचा

    तुमचा वाचवा हा शब्द आहे, तो बुडवा हा शब्द होईल असं करु नका...

  • 04 Mar 2022 11:18 AM (IST)

    ओबीसींच्या पाठीमागे मजबुतीनं उभे आहात, ही चांगली बाब आहे - भुजबळ

    फडणवीसजी यांनी काल सुप्रीम कोर्टात कोर्टात काय झालं, त्यात आपलं मत मांडलं. त्यांचं स्वागत करतो.. ओबीसींच्या पाठीमागे मजबुतीनं उभे आहात, ही चांगली बाब आहे.. म्हणून भाजपच्या एका भगिनीनं टोपी घालून दिली, म्हणूनच मी ती लगेचच घातली.. ओबीसी वाचवा...

    जे खासदार विल्सन तामिळनाडूचे. त्यांच्या संदर्भातला उल्लेख कोर्टानं केला. की त्यांनी सांगितलं की अशा अशा अमेंडमेन्ड ज्या पार्लमेन्टमध्ये झालेल्या आहेत, राजकीयदृष्ट्या आरक्षण देण्याचा निर्णय मान्य केलाय. त्यांनी पुढे असं म्हटलंय की कबूल आहे, की ओबीसींना आरक्षण दिलं पाजि.े. पण या डाटाची स्क्रूटीनी आम्ही नाही करु शकत, असं कोर्टानं म्हटलंय.

    तो डेटा कमिशननं पडताळायचा आहे. आमच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. १५ दिवसांत रिपोर्ट मागवून घ्या, असं कोर्टानं म्हटलं होतं. ते आम्ही १५ दिवसांत दिलं.. तिथे बसलेले आयोगाचे अध्यक्ष ते माजी न्यायमूर्ती आहेत.

    मला हे कळलं नाही. की चर्चा चर्चा करता... आपणही आता मान्य करा की मी ही तुमच्यासोबत यावर चर्चा करत असतो.. तुम्हीही सपोर्ट करत असता. कालच निर्णय घेतला कॅबिनेटनं ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको, हे आम्हीही मान्य केलंय. तुमचाही त्याला पाठिंबा मिळालाय. पण याच्यात एकमेकांवर चिखलफेक करुन काहीही होणार नाही...

    तुम्ही सांगणार १५ दिवसांत काय केलं नाही.. आम्ही सांगणार ७ वर्षात तुम्ही काय केलं नाही.. असं करुन काय होईल.. आपण एकमेकांना विश्वासात घेऊन मार्ग काढायला हवं.. मध्य प्रदेशच्या कायद्यावर मी सुद्धा आपल्यासोबत चर्चा केली.. आमचा तोडगा काढण्याला विरोध नाही.. एकमेकांची उणीधुणी काढण्यापेक्षा.. ओबीसींबाबत आपण एकमतानं निर्णय घेऊ शकलो, तर चांगलं होई..

    तुम्हीही टोप्या घालून बसला.. की ओबीसी वाचवा.. मी ही टोपी घातली आहे.. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी सरकार ठाम आहे.

  • 04 Mar 2022 11:15 AM (IST)

    OBC Reservation: तर ओबीसींना कधीच आरक्षण मिळणार नाही, फडणवीसांनी सभागृहात भीती बोलून दाखवली

    काल सर्वोच्च न्यायालयात राजकी आरक्षण पूर्णपणे संपलंय. राज्य सरकारचं हसं झालं. १३-१२-२०१९ला राज्यसरकारला डेडीकेटेड कमिशन तयार करुन ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार करायला सांगितलं. पण सव्वादोन वर्षात एक पैशाचं काम सरकारनं केला नाही. कोर्टानं अंतरिम अहवाल देण्याची परवानगी दिली होती. पण हा अहवाल म्हणजे एक प्रकारची थट्टा आहे.

    हा अहवाल कशाच्या आधारं तयार केला असं विचारलं तर त्यावर वकिलांना उत्तर देता नाही. अहवालावर साधी तारीख नव्हती, सह्या नव्हत्या.. जजसाहेबांनी विचारलं, की अशाप्रकारे कामकाजाची पद्धत असते का.. डेटो कुठून गोळा केला, कसा गोळा केला, याची काहीही माहिती नाही.. सामाजिक मागासलेपणाच्या डेटाचा कुठे उल्लेखच नाही.. त्यावर कोर्टानं विचारलं.. की मागच्या वेळी हीच आकडेवारी तुम्ही नाकारली आणि आता तुम्हीच तो नाकारता. याचा काय अर्थ...

    अपेक्षित हे आहे की आरक्षण नसलं तर ओबीसींना न्याय मिळणार नाही... आरक्षण नसेल तर ओबीसींनी प्रतिनिधीत्व मिळणार नाही, याबाबत एक अवाक्षर नाही या अहवालात नाही.. हे डेडिकेटेड कमिशन आहे..

    आपण भुजबळ साहेबांना विचारा.. आमची भूमिका सहकार्याची आहे. मदत करण्याची आहे.. पण राज्य सरकार गंभीर आहे का.. की कुणाच्या दबावाखाली आहे? आपण टोपी घातली पण हे आपल्याला टोपी घालत आहेत, हे लक्षात ठेवा...

    तुमचे आमचे राजकीय मतभेद असतील, पण आरक्षणाच्या बाबतीत आम्ही तुमच्या सोबत आहोत...

  • 04 Mar 2022 11:14 AM (IST)

    राज्यपाल कोश्यारी आज सोलापूर दौऱ्यावर; आसरा चौकात कोश्यारींविरोधात शिवप्रेमी एकवटले

    औरंगाबाद येथील वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. विवेकानंद केंद्राच्या वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग ॲन्ड मॅनेजमेंट प्रकल्पाचे लोकार्पण राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.

    सकाळी राज्यपाल सोलापूर विमानतळावर पोहोचणार होते. मात्र त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापुरातील शिवप्रेमींनी तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवलाय.

    सोलापुरातील आसरा चौकात शेकडो शिवप्रेमी जमले असून कोश्यारींविरोधात घोषणाबाजी करण्यात येतेय. यावेळी भगवे झेंडे घेऊन राज्यपालांनी घेरण्यासाठी अनेक शिवप्रेमी एकवटल्याचं पाहायला मिळालंय.

    समर्थ नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणी विचारलं असतं, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकारण तापलं होत.

    आता सोलापुरात वातावरण तापलं असून राज्यपालांना घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिवप्रेमींची एकजूट पाहायला मिळाली आहे.

    या परिस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही बंदोबस्त वाढवला आहे.

  • 04 Mar 2022 11:13 AM (IST)

    सरकार निर्ढावलेलं आहे - गिरीष महाजन

    सरकार निर्ढावलेलं आहे.. निर्लज्जतेचा कळस मला वाटते. मलिकांना अटक झाली, त्यांना ईडीनं ताब्यात घेतलंय. आमची मागणी आहे हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे..

    ही दादागिरी चालणार नाही.. तो पर्यंत राजीनामा घेणार नाही, मंत्रिपदावरुन काढणार नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहिल..

    जनाची नाही तर मनाची तरी पाहिजे ना सरकारला.. हे सगळे दाऊदचे हस्तक आहेत.. नगण्य किंमतीत या जमिनी त्यांनी हडप केलाय.. राजकीय इतिहासात हे पहिल्यांदा असं होतंय..

    बाळासाहेबांनी काँग्रेसचे पाय धरले असतो का... सोनियांचे पाय धरले असते.. ही कसली शिवसेना.. ही तर दाऊदसेना

  • 04 Mar 2022 10:35 AM (IST)

    संजय राऊत नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या भेटीला

    राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडी ने अटक केली आहे.त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी खासदार शिवसेना नेते नवाब मलिक त्यांच्या घरी दाखल झाले आहेत.नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक,मुलगी सना खान, बहीण नगरसेविका सईदा खान यांच्या सह सर्व कुटुंब इथे उपस्थित आहे.तर संजय राऊत यांच्यासह त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत ही उपस्थित आहेत. आज भाजप प्रणित वाहतूक सेनेने कामगारांच्या मशाल मोर्चाचे आयोजन केले आहे.1 वाजताच्या दरम्यान नवाब मलिक यांच्या घराजवळच असलेल्या कार्यालय वर ही मशाल मोर्चा येणार आहे.यात आशिष शेलार देखील शामिल असतील.त्यामुळे संजय राऊत यांची मलिक यांच्या कुटुंबाची भेट ही महत्त्वाची आहे.

  • 04 Mar 2022 10:34 AM (IST)

    एसटीबंदमुळे परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना फटका

    एसटीबंदमुळे परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना फटका

    ग्रामीण भागात परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांचा मोटर सायकल प्रवास

    एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे विद्यार्थ्यांना पोहचण्यासाठी विलंब

    परीक्षा केंद्रावर कोरोना चे नियम पाळत परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा केंद्रावर प्रवेश

    जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागाकडून कोरोनाच्या नियमाची अंमलबजावणी

  • 04 Mar 2022 10:32 AM (IST)

    नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

    संजय राऊत नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या भेटीला मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचं आंदोलन अर्थसंकल्पीय आंदोलनाचा दुसरा दिवस मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाची स्वाक्षरी मोहीम

  • 04 Mar 2022 10:11 AM (IST)

    ‘झुंड’चे खरे नायक विजय बारसे आपल्या टीमसह पोहोचले चित्रपट बघायला

    - ‘झुंड’चे खरे नायक विजय बारसे आपल्या टीमसह पोहोचले चित्रपट बघायला

    - वाजत गाजत विजय बारसे यांचं चित्रपटगृहात स्वागत

    - झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलीय विजय बारसे यांची भुमिका

    - स्लम स्कॅालरची सर्व टीम पोहोचली झुंड बघायला

    - झुंड नागपूरचे फुटबॅाल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

  • 04 Mar 2022 10:10 AM (IST)

    आज पासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात

    अकोला : आज पासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे...

    जिल्ह्यात बारावी साठी 85 मुख्य आणि 180 उपकेंद्र असे 265 केंद्र असून 26 हजार 873 विद्यार्थी हे परीक्षेला बसणार आहे....

    तर यासाठी शिक्षण विभागाकडून 265 केंद्रा वरती ही परीक्षा घेतल्या जाणार आहे.... तर परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार व कॉफी करू नये यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहे....

  • 04 Mar 2022 09:48 AM (IST)

    रत्नगिरी जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण

    रत्नगिरी जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण

    रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 185 केंद्रावरती 29433 हजाराहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

    15 पेक्षा जास्त विद्यार्थी असणाऱ्या महाविद्यालयात शाळा तेथे परीक्षा केंद्र

    लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास जादा वेळ

    कोरोनाचे सर्व नियम पाळून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर

  • 04 Mar 2022 09:47 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील रिद्धपुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप...

    अमरावती जिल्ह्यातील रिद्धपुर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप...

    ग्रामस्थांनी केला टायर जाळून घटनेचा निषेध..

    परिसरात तणावाचे वातावरण; घटनास्थळी पोलीस दाखल....

    पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांना जोपर्यंत अटक होत नाही तो पर्यत शांत बसणार नाही...

    आंदोलकांची भूमिका;यापूर्वीही असाच प्रकार घडल्याचा आरोप...

  • 04 Mar 2022 09:46 AM (IST)

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोलापूर दौऱ्यावर येतायत

    - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सोलापूर दौऱ्यावर येतायत

    - राज्यपालांच्या दौऱ्याला सोलपुरातील शिवसैनिकांचा विरोध

    - सोलापूर आंदोलन आसरा चौकात जमले

  • 04 Mar 2022 09:08 AM (IST)

    नागपूर विभागातून १ लाख ६२ हजार ५१९ विद्यार्थी बारावीची परीक्षा देतील

    - कोरोनानंतर पहिल्यांदाच आजपासून बारावीची ॲाफलाईन लेखी परिक्षा

    - परिक्षा केंद्रावर विद्यार्थी येण्यास सुरुवात

    - १०ः३० ला सुरु होणार पेपर, ९ः३० ला विद्यार्थी वर्गात बसणार

    - नागपूर विभागातून १ लाख ६२ हजार ५१९ विद्यार्थी देतील बारावीची परीक्षा

    - विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांमधील परीक्षा केंद्रातच परिक्षा

    - नागपूर विभागातील १६२० कनिष्ठ महाविद्यालयांच्या १५३६ केंद्रांवर होईल परीक्षा

    - १४ पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेतील केंद्र

    - विभागीय मंडळाने परीक्षा केंद्रावर भेटी नेमली जिल्हानिहाय सहा पथके

    - जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांच्या पथकांसह एकूण ४२ पथकांचा समावेश

  • 04 Mar 2022 09:07 AM (IST)

    पिंपरी चिंचवड पोलिसांकडून लाखो रूपयांचा गुटखा जप्त

    -पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने थेरगाव मध्ये कारवाई करत एक लाख हुन अधिक किंमतीचा गुटखा जप्त केलाय

    -थेरगाव परिसरात एका स्कोडा गाडीत गुटखा विक्री साठी येणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या नुसार कारवाई करत गुटखा जप्त करण्यात आलाय

    -या प्रकरणी हरीराम बीष्णोई याच्या सह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय

  • 04 Mar 2022 09:05 AM (IST)

    बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

    मालेगांव तालुक्यातील सोनज आणि नामपूरच्या जायखेडा येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला.

    उन्हाची चाहूल लागताच आता जंगलातील पाणवठे कमी झाल्याने बिबट्यांनी आपला मोर्चा नागरी भागात वळवल्याचे दिसून येत आहे. गेल्या ८ दिवसांत कसमादे या चारही भागात बिबट्या दिसून आला होता.रात्री दोन शेतकऱ्यांवर देखील हल्ला झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.रात्रीच्या वेळेस शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज उपलब्ध होते. म्हणून शेतात पाणी भरण्यासाठी शेतकरी रात्रभर असतो आणि बिबट्या त्या ठिकाणी दबा धरून असल्याने शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागाच्या वतीने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.यावेळी बिबट्याच्या सोबत लहान पिलू देखील पाहावयास मिळाले असल्याचे सांगितले जाते.

  • 04 Mar 2022 09:02 AM (IST)

    राज्यातील 14 जिल्हे आजपासून पूर्णपणे निर्बंधमुक्त

    राज्यातील 14 जिल्हे आजपासून पूर्णपणे निर्बंधमुक्त, नाट्यगृहं-थिएटर्स-रेस्टॉरन्ट पूर्ण क्षमतेनं सुरु होणार ठाणे-नवी मुंबई पालिका क्षेत्रातही निर्बंध शिथिल होणार

    राज्यातील कोणते जिल्हे निर्बंधमुक्त?

    मुंबई शहर मुंबई उपनगर पुणे नागपूर भंडारा सिंधुदुर्ग रायगड वर्धा रत्नागिरी सातारा सांगली गोंदिया चंद्रपूर कोल्हापूर

  • 04 Mar 2022 09:00 AM (IST)

    ठाणे जिल्ह्यात बारावीचे 94 हजार 941 विद्यार्थी देणार परीक्षा 

    ठाणे जिल्ह्यात बारावीचे 94 हजार 941 विद्यार्थी देणार परीक्षा

    आज पासून केंद्रावर मनाई आदेश जारी

    100 मीटर परिसरात बेकायदेशीर जमावास मज्जाव

    मुख्य परीक्षा केंद्र -167

    उप परीक्षा केंद्र -252

  • 04 Mar 2022 08:56 AM (IST)

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे कृषीपंपाना दिवसा सलग सहा तास वीज देण्या संदर्भातील आंदोलन

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे कृषीपंपाना दिवसा सलग सहा तास वीज देण्या संदर्भातील आंदोलन...

    शेतकऱ्यांना वीज मिळण्या संदर्भात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना पत्र दिले..

    अधिवेशनात यप्रकरणी लक्षवेधी लावणार..

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांची माहिती...

    अधिवेशन असल्याने आमदार देवेंद्र भुयार आंदोलनात सहभागी होणार नाही...

  • 04 Mar 2022 08:05 AM (IST)

    पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची आज निवडणूक

    - पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची आज निवडणूक,

    - यासाठी भाजपकडून विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांना चौथ्यांदा संधी,

    - तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदीप गायकवाड यांना उमेदवारी,

    - स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असले तरी दगाफटका होऊ नये यासाठी भाजपने काळजी घेतलीय,

    - फक्त १४ दिवसांसाठी नवे स्थायी समिती अध्यक्ष निवडले जाणार आहेत

  • 04 Mar 2022 08:05 AM (IST)

    बँकेसमोरून वृद्ध दाम्पत्याची ५ लाखाची रोकड लुटून आरोपी फरार

    एमआयडीसीतील एसबीआय बँकेसमोरील घटना

    नागपूर शहरातील एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेतून ५ लाख रुपयांची रोकड पिशवीत भरून नेताना पार्किंग रस्त्यावरच दोन बाईकस्वारांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून हिंगणा मार्गाकडे पळ काढला.

  • 04 Mar 2022 07:15 AM (IST)

    स्वाभिमानीचे कार्यकर्ते राज्यभर चक्काजाम करण्याच्या तयारीत

    स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टीचे राज्यभर चक्काजाम करण्याच्या आवाहनाचे जिल्ह्यात पडसाद,

    स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री च टायर जाळून केला रस्ता रोको,

    शेगांव - जळगांव जामोद रस्ता अडवला,

    सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी ,

    महावितरण विरोधात सुरुय राजू शेट्टी यांचे आंदोलन,

  • 04 Mar 2022 07:13 AM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यात बारावीसाठी 34 हजार 560 विद्यार्थी परीक्षा देणार

    आजपासून 12 वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात बारावीसाठी 34 हजार 560 विद्यार्थी हे परीक्षेला बसणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून 353 केंद्रावरती ही परीक्षा घेतल्या जाणार आहे. परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार व कॉफी करू नये यासाठी पाच भरारी पथके नेमण्यात आली आहे.

  • 04 Mar 2022 07:08 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात एकूण ३८ हजार ११० विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

    अमरावती जिल्ह्यात एकूण ३८ हजार ११० विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा..

    जिल्ह्यात एकूण ३९७ केंद्रांवर घेतली जाणार परीक्षा,परीक्षेसाठी १९६ मुख्य तर ४६६ उपकेंद्र..

    परीक्षावर लक्ष ठेवण्यासाठी १४ भरारी पथके, एक महिला पथक तयार .

  • 04 Mar 2022 07:08 AM (IST)

    नागपूर महापालिका निवडणुक ओबीसी आरक्षणाशिवायच होण्याची शक्यता

    - नागपूर महापालिकेतील ओबीसींसाठी राखीव ३४ जागा खुल्या प्रवर्गात जाणार

    - महापालिकेत नवीन प्रभाग रचनेनुसार एकूण १५६ जागांपैकी ३४ जागा ओबीसींसाठी राखीव होत्या

    - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भातील अंतरिम अहवाल फेटाळल्याने आरक्षणाशिवायच निवडणुका!

    - ओबीसींच्या जागा खुल्या प्रवर्गामध्ये वर्ग होणार असल्याने खुल्या प्रवर्गाच्या जागा वाढणार

    - ओबीसींच्या इच्छूक उमेदवारांना बसणार मोठा फटका

  • 04 Mar 2022 07:07 AM (IST)

    बारावीची ॲाफलाईन लेखी परिक्षा

    - करोनानंतर पहिल्यांदाच आजपासून बारावीची ॲाफलाईन लेखी परिक्षा

    - नागपूर विभागातून १ लाख ६२ हजार ५१९ विद्यार्थी देतील बारावीची परीक्षा

    - विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांमधील परीक्षा केंद्रातच आजपासू परिक्षा

    - नागपूर विभागातील १६२० कनिष्ठ महाविद्यालयांच्या १५३६ केंद्रांवर होईल परीक्षा

    - १४ पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेतील केंद्र - विभागीय मंडळाने परीक्षा केंद्रावर भेटी नेमली जिल्हानिहाय सहा पथके

    - जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांच्या पथकांसह एकूण ४२ पथकांचा समावेश

  • 04 Mar 2022 06:28 AM (IST)

    आज अधिवेशनात या घडामोडी होण्याची शक्यता

    आज अधिवेशनात या घडामोडी होण्याची शक्यता

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस ओबीसी आरक्षणावरून गाजणार

    ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप उद्या राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत

    देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आज भाजपच्या सर्व आमदारांसाठी स्नेह भोजन ठेवण्यात आले होते यावेळी उद्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती ठरली

  • 04 Mar 2022 06:26 AM (IST)

    विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे मुंबई विमानतळावर

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत पोहोचले.
    ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत भारतीयांना घेऊन मुंबईला पोहोचणारे एअर इंडियाचे हे चौथे विमान आहे.
    या विमानाने 180 भारतीय नागरिकांना रोमानियातून आणले आहे.
    विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे मुंबई विमानतळावर पोहोचले होते.
    मुंबई विमानतळावर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी तिरंगा घेऊन मुलांचे स्वागत केले.
    युक्रेनमधून मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, तिथली परिस्थिती खूप वाईट आहे, अजूनही अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या भागात अडकले आहेत.

Published On - Mar 04,2022 6:20 AM

Follow us
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.