75 वर्षीय वृद्धाचा 35 वर्षाच्या मनभावतीसोबत विवाह, लग्नाची पहिली रात्र उलटताच संगरुरामचा मृ्त्यू, नेमकं काय घडलं?

एक हैराण करणारं प्रकरण समोर आलय. एका 75 वर्षीय वुद्धाने 35 वर्षीय महिलेसोबत आधी कोर्ट मॅरेज केलं. नंतर मंदिरात रीतसर लग्न. पण लग्नाच्या दुसऱ्याचदिवशी संगरुरामचा मृ्त्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

75 वर्षीय वृद्धाचा 35 वर्षाच्या मनभावतीसोबत विवाह, लग्नाची पहिली रात्र उलटताच संगरुरामचा मृ्त्यू, नेमकं काय घडलं?
Man died night after their wedding
Updated on: Oct 01, 2025 | 9:04 AM

एका 75 वर्षीय वुद्धाने 35 वर्षीय महिलेसोबत आधी कोर्ट मॅरेज केलं. नंतर मंदिरात रीतसर लग्न केलं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वुद्ध पतीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. 75 वर्षीय संगरुराम यांच्या पत्नीचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. संगरु यांना अपत्य नाहीय. ते एकटेच राहत होते. या दरम्यान त्यांनी जोडीदारसोबत उर्वरित आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. संगरु यांनी 35 वर्षीय मनभावती सोबत कोर्टात दुसर लग्न केलं. उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील गौराबादशाहपुर क्षेत्रातील हे प्रकरण आहे.

मनभावतीला तीन मुलं आहेत. संगुरुने लग्नाआधी आश्वासन दिलेलं की, ते माझ्यानावे त्याची जमीन आणि संपत्ती करतील असं मनभावतीने संगुरुरामच्या मृत्यूनंतर सांगितलं. त्याशिवाय मनभावतीच्या तीन मुलांच्या भविष्यासाठी एक-एक लाख रुपयांचं फिक्स डिपॉझिट करणार. संगरुच्या शब्दावर विश्वास ठेऊन मनभावतीने त्याच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं. पण पुढच्याच दिवशी पती संगरुचा मृत्यू झाला.

दुसरं लग्न करण्याच्या हट्टाला पेटले

वर्षभरापूर्वी पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर संगरु दुसरं लग्न करण्याच्या हट्टाला पेटले होते. त्यांना मोठे भाऊ मंगरुरामसह गावातील अन्य लोकांनी समजावलं. भाच्याने त्यांना दिल्लीत येऊन सोबत रहायला सांगितलं, जेणेकरुन त्यांना खाण्या-पिण्याची कुठली अडचण होणार नाही. पण संगरु ऐकले नाहीत.

आयुष्यातील शेवटचा आनंद ठरेल

उतारवयात लग्न करुन संगरुराम यांनी नव्या जोडीदारासोबत संसार थाटण्याची स्वप्न पाहिली होती.पण त्यांना हे माहित नव्हतं की, हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा आनंद ठरेल. सोमवारी लग्नानंतर पत्नी-पत्नी घरी आले. त्यांच्यात बरच बोलणं झालं. मनभावतीने सांगितलं की, जेवण झाल्यानंतर संगरु दोन मुलांसोबत बाहेर झोपले. तिला मुलीसोबत आतल्या खोलीत झोपायला सांगितलं. मंगळवारी सकाळी संगरु यांनी स्वत:जाऊन पत्नीला उठवलं. त्यानंतर काही वेळाने बाहेर चटईवर झोपलेल्या संगरुराम यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला.

अत्यंसंस्कार करु दिले नाहीत

मनभावतीने सांगितलं की, पती संगरुरामची तब्येत चांगली होती. अचानक त्यांची तब्येत बिघडली. मनभावतीला आजाद नावाच्या युवकाने फोन करुन डॉक्टरला बोलवायला सांगितलं. डॉक्टरांनी घरी आल्यानंतर संगरुरामला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. आजादने गाडीची व्यवस्था करुन संगरुरामला रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. संगरुराम यांच्या भाच्यांनी त्यांचे अत्यंसंस्कार करु दिले नाहीत. पोस्टमार्टमनंतरच मृत्यूच खरं कारण स्पष्ट होईल.