Andheri Child fell : आजोबा खाली वॉचमनशी बोलत होते, मुलगी सहाव्या मजल्यावरुन पाहत होती, तितक्यात मोठा आवाज आला म्हणून पाहिले तर…

| Updated on: May 11, 2023 | 3:21 PM

आई-वडिल कामाला गेले होते. आजोबा खाली वॉचमनशी बोलत होते. तर चार वर्षाची मुलगी घरी आजीसोबत होती. इतक्यात मोठा आवाज आला म्हणून आजोबांनी जाऊन तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

Andheri Child fell : आजोबा खाली वॉचमनशी बोलत होते, मुलगी सहाव्या मजल्यावरुन पाहत होती, तितक्यात मोठा आवाज आला म्हणून पाहिले तर...
सहाव्या मजल्यावरील बालकनीतून पडल्याने मुलगी जखमी
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : अंधेरीत एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. सहाव्या मजल्यावरील गॅलरीतून पडल्याने चार वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मुलीला तात्काळ अंधेरीतील होली स्पिरीट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बालकनीच्या रेलिंगची काच फुटली होती. बिल्डिंग मॅनेजरकडून दुरुस्तीचे काम सुरु होते. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती. यामुळेच ही घटना घडली. याप्रकरणी मुलीचे वडील सौरभ प्रभुनंदन प्रसाद यांनी हाऊसिंग सोसायटीचे व्यवस्थापक, कंत्राटदार आणि रिअल इस्टेट फर्मच्या व्यवस्थापकाविरुद्ध एमआयडीली पोलीस ठाण्ायात तक्रार नोंदवली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बालकनीच्या रेलिंगची काट तुटली होती

एमआयडीसी परिसरातील हिलक्रेस्ट सोसायटीमध्ये ही घटना घडली. पीडित मुलगी मंगळवारी दुपारी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील बालकनीत उभी होती. बालकनीच्या रेलिंगची काच आधीच तुटली होती. त्याबाबत मुलीच्या वडिलांनी बिल्डिंग मॅनेजरकडे आधीच तक्रार नोंदवली होती. त्यांच्या तक्रारीवरुन बिल्डिंग मॅनेजरकडून दुरुस्तीचे काम सुरु होते. मॅनेजरने तुटलेली काच काढून नेली. पण सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना केली नाही.

मुलगी बालकनीतून खाली पडली

मुलीचे आई-वडिल दोघेही नोकरी करतात. मंगळवारी नेहमीप्रमाणे आई-वडील दोघेही कामावर गेले होते. मुलगी आजी-आजोबांसोबत घरी होती. मुलीचे आजोबा खाली वॉचमनशी त्या तुटलेल्या काचेसंदर्भातच बोलत खाली बोलत होते. तर मुलगी सहाव्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटच्या बालकनीत होती. अचानक काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. आजोबा आणि वॉचमनने जाऊन पाहिले तर नात खाली पडली होती.

हे सुद्धा वाचा

गंभीर जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु

अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मुलीला तात्काळ होली स्पिरीट रुग्णालयात नेण्यात आले असून, सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.