मित्र अडचणीत होता, तिने मदतीचा हात पुढे केला, पण तिला कुठे माहित होतं तो फक्त व्यवहार करत होता !

मित्र अडचणीत होता म्हणून तिने मैत्रीचे नाते निभावत त्याला मदत केली. पण त्याला याची जाणीव कुठे होती. जेव्हा मैत्रीण अडचणीत आली तेव्हा तिला मदत करण्याऐवजी त्याने जे केले ते पाहून मैत्रीवरचा विश्वासच उडेल.

मित्र अडचणीत होता, तिने मदतीचा हात पुढे केला, पण तिला कुठे माहित होतं तो फक्त व्यवहार करत होता !
अनैतिक संबंधातून पत्नी आणि भावाने तरुणाला संपवले
Image Credit source: freepik
| Updated on: May 05, 2023 | 7:33 PM

थ्रिसूर : उसने दिलेले पैसे आणि दागिने परत मागितले म्हणून मित्रानेच मैत्रिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली. घटना उघड होताच एकच खळबळ उडाली. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात पुरले. अथिरा असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या मित्राला अटक केली आहे. अखिल असे अटक आरोपीचे नाव आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून अखिलने अथिराची क्रूर हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून अथिराचा मृतदेह ताब्यात घेतला.

काय प्रकरण आहे?

अथिरा आणि अखिल दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. काही दिवसांपूर्वी अखिलला पैशांची गरज होती. अथिराने मैत्रीखातर त्याला काही पैसे आणि दागिने दिले होते. मात्र सध्या अथिराही अडचणीत असल्यामुळे तिने अखिलकडे दागिने आणि पैसे परत करण्याची मागणी केली. याच कारणातून अखिलने तिचा काटा काढण्याचे ठरवले. दागिने आणि पैसे द्यावे लागू नये म्हणून अखिलने अखिराची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन जंगलात पुरले.

‘असा’ उघड झाला गुन्हा

पत्नी अचानक बेपत्ता झाल्याने अखिराचा पती सनीलने कलाडी पोलिसात तक्रार दाखल केली. पतीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी फिर्याद नोंदवत अखिराचा शोध सुरु केला. तपासादरम्यान, अखिराचे शेवटचे लोकेशन चालकुडी येथी थंबूरमुझी जंगलात दाखवले. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता ती शेवटची अखिलसोबत जाताना दिसली.

यानंतर अखिलला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता घटना उघड झाली. अखिराकडून घेतलेले पैसे आणि दागिने परत करावे लागू नये म्हणून अखिलने तिची हत्या केल्याचे आरोपीने सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अखिराचा मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर अखिल विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत, त्याला अटक करण्यात आली आहे.