AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रॅपिडोवरुन ऑनलाईन बाईक तरुणीने बुक केली, मात्र मित्राच्या घरी पोहचलीच नाही; कारण…

डॉक्टरांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक सिटी पोलिसांनी तक्रार नोंदवत दोघांना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी तरुणीवर बलात्कार होत होता, तेव्हा एक महिला देखील तिथे उपस्थित होती.

रॅपिडोवरुन ऑनलाईन बाईक तरुणीने बुक केली, मात्र मित्राच्या घरी पोहचलीच नाही; कारण...
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Nov 30, 2022 | 1:28 PM
Share

बंगळुरु : एका मित्राच्या घरातून दुसऱ्या मित्राच्या घरी जाण्यासाठी एका 22 वर्षीय तरुणीने रॅपिडोवरुन बाईक बुक केली. त्यानंतर बाईकवर बसून महिला तिच्या मित्राकडे चालली होती. मात्र महिलेच्या मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत बाईक चालकाने तिला मित्राच्या घरी न नेता स्वतःच्या घरी नेले. तेथे त्याने आपल्या मित्रासोबत मिळून रात्रभर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सकाळी महिलेला शुद्ध आल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. यानंतर ती हॉस्पिटलमध्ये गेली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले.

घटनेवेळी एक महिला उपस्थित असल्याची माहिती

डॉक्टरांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक सिटी पोलिसांनी तक्रार नोंदवत दोघांना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी तरुणीवर बलात्कार होत होता, तेव्हा एक महिला देखील तिथे उपस्थित होती. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणी केली असल्याचे, पोलीस आयुक्त प्रताप रेड्डी यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

मूळची केरळ येथील असलेली तरुणीने बंगळुरुत एका मित्राच्या घरुन दुसऱ्या मित्राच्या घरी जाण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री बाईक टॅक्सी बुक केली. चालक तिला इच्छित स्थळी घेऊन गेला. मात्र तरुणीने एवढी नशा केली होती, की तिला बाईकवरुन उतरण्याची शुद्धच नव्हती.

तिच्या या परिस्थितीचा फायदा घेत चालकाने तिला आपल्या घरी नेले. तेथे त्याने आपल्या मित्रासोबत मिळून तिच्यावर रात्रभर बलात्कार केला. यापैकी एका आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलीस याप्रकरणी सखोल चौकशी करत आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी