रिसेप्शनसाठी रुममध्ये तयार होत होते नवरा-नवरी, रुमचा दरवाजा खोलताच जे दिसले त्याने घरच्यांना धक्काच बसला !

| Updated on: Feb 23, 2023 | 4:00 PM

कहकशा बानो आणि असलम यांचा 19 फेब्रुवारी रोजी प्रेमविवाह संपन्न झाला. यानंतर 21 फेब्रुवारी रोजी त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. रिसेप्शनच्या दिवशी तयारी करण्यासाठी दोघे जण आपल्या रुममध्ये गेले. रुममध्ये गेल्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला.

रिसेप्शनसाठी रुममध्ये तयार होत होते नवरा-नवरी, रुमचा दरवाजा खोलताच जे दिसले त्याने घरच्यांना धक्काच बसला !
रिसेप्शनपूर्वीच नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू
Follow us on

रायपूर : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवविवाहित वधू-वराच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली. रिसेप्शनसाठी तयारी करण्यासाठी रुममध्ये गेलेल्या नवरा-नवरीमध्ये काही कारणावरुन वाद झाला. यानंतर नवऱ्याने नवरीला चाकूने भोसकून मग स्वतःला संपवल्याची घटना घडल्याने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन दिवसापूर्वीच दोघांचा प्रेमविवाह झाला होता. कहकशा बानो आणि असलम अशी मयत वधू-वराची नावे आहेत. रायपूरमधील टिकरापारा परिसरात ही घटना घडली.

रिसेप्शनसाठी रुममध्ये तयार व्हायला गेले होते

कहकशा बानो आणि असलम यांचा 19 फेब्रुवारी रोजी प्रेमविवाह संपन्न झाला. यानंतर 21 फेब्रुवारी रोजी त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. रिसेप्शनच्या दिवशी तयारी करण्यासाठी दोघे जण आपल्या रुममध्ये गेले. रुममध्ये गेल्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, असलमने चाकूने कहकशा बानोवर हल्ला केला. यानंतर त्याने स्वतःवर चाकूने वार केले.

गंभीर जखमी जोडप्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

घरचे लोक नववधू-वराला पहायला रुममध्ये आले असता हा धक्कादायक प्रकार पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ गंभीर जखमी नवदाम्पत्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.

हे सुद्धा वाचा

दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणातून वाद झाला हे कळू शकले नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाच्या दोन दिवसात नवदाम्पत्याच्या अशा मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे.