AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगा 40 वर्षाचा झाला तरी बाप लग्न करुन देत नव्हता, मग संतापलेल्या मुलाने बापाला थेट…

मुलाचे लग्नाचे वय उलटून चालले होते. मात्र बाप लग्न करुन द्यायचे नावच घेत नव्हता. यामुळे मुलगा चिडला होता. अखेर संतापाच्या भरात मुलाकडून जे घडू नये ते घडले.

मुलगा 40 वर्षाचा झाला तरी बाप लग्न करुन देत नव्हता, मग संतापलेल्या मुलाने बापाला थेट...
घरात दुर्गंधी येत होती म्हणून पोलिसांनी जाऊन पाहिले तर...Image Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 03, 2023 | 10:45 AM
Share

बुलढाणा / गणेश सोळंकी : मुलाचे लग्नाचे वय उलटून चालले तरी बाप लग्न करुन देत नव्हता. अखेर संतापलेल्या मुलाने बापाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे. बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यात ही भयंकर घटना घडली. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत आरोपीला अटक केली आहे. बाप-लेक दोघेही वीटभट्टी कामगार होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नानसिंग भैरड्या असे मयत बापाचे नाव आहे, तर भानसिंग भैरड्या असे आरोपी मुलाचे नाव आहे.

दोघे पिता-पुत्र वीटभट्टी कामगार होते

भैरड्या पिता-पुत्र दोघे वीटभट्टीवर मजुरीचे काम करत होते. भानसिंग हा 40 वर्षाचा आहे. मात्र लग्नाचे वय उलटले तरी बाप त्याच्या लग्न करुन देत नव्हता. यामुळे मुलाचा संताप होत होता. अखेर संतापाच्या भरात मुलाने बापाला जीवघेणी मारहाण केली. यात गंभीर जखमी बापाचा जागीच मृत्यू झाला.

जळगाव जामोद पोलिसांना हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. यानंतर बापाची हत्या करणाऱ्या आरोपी मुलाला अटक केली आहे.

पुण्यात सरपंचाची हत्या

साईबाबांचं प्रति शिर्डी अर्थात पुण्यातील शिरगावच्या सरपंचाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सरपंचांचे प्रवीण गोपाळे असं नाव होतं. तीन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोपाळे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. ही हत्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले, त्यानंतर ते भररस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच