AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री गाढ झोपला होता पती, अचानक झोपेतून जाग आली, समोरचे दृश्य पाहिले अन् त्यांनंतर थेट…

पती रात्री गाढ झोपला होता. अचानक रात्री जाग आली तर समोरचं दृश्य पाहून पती संतापला. त्यानंतर जे घडलं ते फार भयंकर होतं. पोलिसांनी कसून तपास करत सर्व प्रकरणाचा उलगडा केला.

रात्री गाढ झोपला होता पती, अचानक झोपेतून जाग आली, समोरचे दृश्य पाहिले अन् त्यांनंतर थेट...
प्रेमप्रकरणातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: TV9 Network
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 03, 2023 | 10:02 AM
Share

रायबरेली : उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीचे गावातील दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध होते. पतीने पत्नीला प्रियकरासोबत आपत्तीजनक स्थितीत पाहिले अन् पतीला संताप अनावर झाला. मग पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याला संपवल्याची घटना रायबरेलीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. राजेश असे मयत पतीचे नाव आहे, तर रेश्मा आणि नान्हू महताब अशी आरोपींची नावे आहेत. रायबरेलीतील बछरावा पोलीस ठाण्याअंतर्गत थूलेहंडी गावात 30 मार्च रोजी ही धक्कादायक घटना घडली. या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पत्नीला प्रियकरासोबत आपत्तीजनक स्थितीत पाहिले, मग…

महिलेचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरु होते. महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीला रात्री भरपूर दारु पाजली. दारु प्यायल्यानंतर पती नशेत झोपी गेला. त्यानंतर पत्नी प्रियकर आपत्तीजनक स्थितीत होते. पतीला रात्री अचानक जाग आली अन् समोर पत्नीला प्रियकरासोबत नको ते करताना पाहिले. यानंतर पती संतापला आणि त्यांना विरोध करु लागला. यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याला संपवले.

शवविच्छेदन अहवालामुळे हत्याकांडाचा उलगडा

बछरावा पोलिसांना राजेशचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालात राजेशची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत प्रकरणाचा तपास सुरु केला.

पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी सुरु केली असता पोलिसांना मयताच्या पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत त्यांची तुरुंगात रवानगी केली.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच