AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे डबल करून देतो… पूजा सुरू असताना डोळेबंद करायला लावले अन्… भोंदू बाबाने असं काही केलं की…

शिक्षणाचा प्रसार वाढत असून अजूनही लोक चमत्कार आणि बुवाबाजीच्या आहारी जात आहेत. अजूनही देशाच्या ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातही अशा बुवाबाजीतून फसवणूक होण्याचे प्रकार घडत असतात. आता नवीमुंबईत असा प्रकार घडला आहे.

पैसे डबल करून देतो... पूजा सुरू असताना डोळेबंद करायला लावले अन्... भोंदू बाबाने असं काही केलं की...
Tantrik Baba cheated
| Updated on: Jul 25, 2025 | 4:52 PM
Share

शिक्षणाचा प्रसार वाढत असूनही लोक बुवाबाजीच्या मागे लागले आहेत. अजूनही देशात अशा बुवाबाजीतून फसवणूक होण्याचे प्रकार वाढत असतात. कोणी गुप्त धनाच्या शोधासाठी आपली जमापुंजी या भोंदूबाबांच्या चरणी वाहतात तर कोणी पैसे दुप्पट करण्यासाठी चमत्कारावर विश्वास ठेवून पैसा खर्च करतात. आणि त्यानंतर मग आपली पुरती फसगत झाल्याचे उघडकीस आल्यानंतर असे लोक जागे होतात. आता नवीमुंबई सारख्या आधुनिक शहरात असा प्रकार घडला आहे. पैसे डबल करतो म्हणून भोंदूबाबाने एका कुटुंबाला २० लाखांना गंडा घातला आहे.

नवी मुंबईत सीबीडी येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका कुटुंबाला पैसे डबल करून देतो म्हणून भोंदू बाबाने घरात पूजा करून त्यांचे वीस लाख रुपये घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणाची फिर्यादीने तक्रार दाखल केली सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये सीबीडी पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत या भोंदूबाबाला आणि त्याच्या चालकाला अटक केली आहे.

भोंदू बाबांना तिथून पळ काढला

या भोंदूबाबाचं नाव सचिन शर्मा असे आहे. या भोंदू बाबाची आणि फिर्यादीची ओळख काही दिवसांपूर्वी झाली होती तेव्हा भोंदूबाबा त्यांच्या घरी आला आणि 20 लाख रुपये पुढे ठेवा मी तुम्हाला डबल करून देतो असे म्हणाला आणि त्यानंतर तंत्र पूजा सुरू केली आणि सर्वांनी डोळे बंद केल्यानंतर त्या भोंदू बाबांना तिथून पळ काढला. या भोंदू बाबाला लगेच सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे आणि एकूण 19 लाख रुपये रोकड जप्त देखील केली आहे. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका अशी प्रतिक्रिया एसीपी मयूर भुजबळ यांनी दिली आहे. अशाप्रकारे पैसे डबल होतं नाहीत नागरिकांनी अफवांच्या आहारी जाऊ नये असेही ते म्हणाले.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा