पतीला मारले, नंतर घरातच पुरले, वर टाईल्स बसवल्या, ‘दृश्यम’ सारखी मर्डर मिस्ट्री
पतीच्या पैशाचा वापरण्यासाठी त्याचे सिमकार्डही गुडीयाने आपल्या मोबाईलमध्ये टाकले होते. गेल्या रविवारी सायंकाळी फॉरेन्सिक टीमने डॉक्टराच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेतला. दोघांवर हत्या आणि पुरावा नष्ट केल्याचे BNS च्या 103, 238, 3(5) गुन्हे दाखल केले असून आरोपींचा शोध सुरु आहे.

अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्याचे प्रकार हल्ली चर्चेत आले आहेत. कोणी आपल्या पतीला निळ्या ड्रममध्ये दफन केले. तर कोणी हनीमूनला नेऊन तेथे त्याचा काटा काढला. मेरठची मुस्कान असो की इंदूरची सोनम यांची कहानी क्रुरतेचा कळस ठरली. आता मुंबईच्या गुडीयाने एक पाऊल पुढे जात आपल्या २० वर्षांच्या प्रियकराच्या मदतीने आधी पतीला संपवले. नंतर घरातच खड्डा खणून त्यात त्याला गाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे तिने आपल्या पतीच्या भावाला बोलावून त्यास बाथरुमसाठी खड्डा खणल्याचे सांगत त्याच्याकडून वर टाईल्स देखील लावून घेतले !
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील नालासोपारा येथे एका पत्नीने आपल्या २० वर्षांच्या प्रियकराच्या मदतीने त्याचा खून केला आणि त्याच घरात टाईल्सच्या खाली दफन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.सध्या दोघेही फरार आहेत. गेल्या सोमवारी ३२ वर्षाच्या विजय चौहान ( रा.जौनपुर उ.प्र.) याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्या पत्नीने त्यास घरात गाडले होते. विजयचा खूप काळ संपर्क न झाल्याने त्याचा भाऊ त्याच्या घरी गेला तेव्हा त्यास दुर्गंध आला, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
विजय चौहान त्याची पत्नी चमन उर्फ गुडीया देवी ( २८ ) हिच्या सोबत नालासोपारा पूर्व येथील धानुबाग परिसरातील साईं शारदा वेलफेयर सोसाइटीत रहात होता. त्यांच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. एक सहा वर्षांचा मुलगाही त्यांना आहे. गुडीया हिचे त्याच गल्लीच्या बाजूला राहणाऱ्या २० वर्षांच्या मोनू विश्वकर्मा याच्या अनैतिक संबंध होते. त्यानी विजयच्या हत्येचा कट रचला होता. गुडीया आणि मोनू विश्वकर्मा यांनी १५ दिवसांपूर्वी विजयची हत्या केली. त्यानंतर विजयला गाडण्यासाठी सहा फूटांचा खड्डा खणला.दोन फूट रुंद आणि चार फूट खोल खड्ड्यात त्याला दफन केले.त्यानंतर टाईल्सने खड्डा बुजवला. याकामासाठी गवंड्याचे काम करणाऱ्या विजयचा लहान भावाला बोलावले.विजय बाहेरगावी गेल्याचे आणि बाथरुमसाठी खड्डा खणल्याचे तिने खोटेच सांगितले. त्यासाठी त्याला एक हजार रुपये दिले.
विजय याचे दोन भाऊ बिलालपाडा येथे राहातात. त्यांनी अलिकडेच नवीन घर खरेदी केले होते. त्यांना विजयकडून पैसे हवे होते. ते त्याला कॉल करत होते. पण कॉल न लागल्याने त्यांनी त्याच्या पत्नीला फोन केला. विजय कामासाठी कुर्ला येथे गेल्याचे गुडीयाने खोटेच सांगितले आणि ती प्रियकरासोबत पळून गेली.
विजय येथे अनेक वर्षे भाड्याच्या घरात रहात होता. त्याने पाच वर्षांपूर्वीच चाळीत हे घर घेतले होते. विजयने गुडीया एकदोन वेळा मारलेही होते. पण तो नशा करायचा नाही असे त्याच्या शेजाऱ्यानी सांगितले. विजयचा लहान भाऊ अखिलेश घरी आला तेव्हा त्यास नवीन टाईल्स लावल्याचे दिसले, तेथून दुर्गंधी येत असल्याने त्याने शेजारच्या लोकांच्या मदतीने काही टाईल्स काढल्या तर तीव्र दु्र्गंध येऊ लागल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी यांनी सांगितले.
