चहाची तलफ महागात पडली, पतीने चहा मागताच पत्नीने जे केले ते पाहून पायाखालची जमीनच सरकेल !

पतीला चहाची तलफ आल्याने त्याने हा वाद थोडा शांत झाल्यानंतर पत्नीकडे चहाची मागणी केली. यानंतर पत्नी इतकी संतापली की बराच वेळ वादावादी केल्यानंतर तिने चाकूने पतीवर हल्लाबोलच केला.

चहाची तलफ महागात पडली, पतीने चहा मागताच पत्नीने जे केले ते पाहून पायाखालची जमीनच सरकेल !
चहा मागितला म्हणून पत्नीने पतीवर चाकूहल्ला केला
Image Credit source: Google
| Updated on: Jan 23, 2023 | 7:47 PM

फर्रुखाबाद : उत्तर प्रदेशात एक चक्रावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीमध्ये कोणत्या कारणावरुन वाद होईल आणि वादातून काय घडेल हे सांगणे कठिण आहे. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे उघडकीस आली आहे. चहा मागितला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाली आहे. जखमी पतीला तात्काळ लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मोठ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

आधी दूध सांडल्यावरुन झाला होता वाद

फर्रुखाबादच्या फतेहगड कोतवाली क्षेत्रातील बुढनामऊ गावात नितिन नामक व्यक्ती आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह राहतो. नितिनचे 15 वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. घरामध्ये दूध सांडल्यावरुन पती-पत्नीमध्ये बराच वाद झाला होता.

चहाची मागणी केल्याने पत्नी आणखी संतापली

पतीला चहाची तलफ आल्याने त्याने हा वाद थोडा शांत झाल्यानंतर पत्नीकडे चहाची मागणी केली. यानंतर पत्नी इतकी संतापली की बराच वेळ वादावादी केल्यानंतर तिने चाकूने पतीवर हल्लाबोलच केला. या हल्ल्यात पतीच्या छातीत वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

हल्ल्यात पती गंभीर जखमी

जखमी पतीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.