सुट्टी असल्याने मित्रांसोबत फिरायला गेला होता तरुण, पण ही पिकनिक शेवटचीच ठरली !

मयत अनुप पटवाल हा मूळचा उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील रहिवासी असून, डेहरादून येते एनडीएची तयारी करत होता. शनिवारी सुट्टी असल्याने तो आपल्या मित्रांसोबत हरिद्वार येथे फिरायला गेला होता.

सुट्टी असल्याने मित्रांसोबत फिरायला गेला होता तरुण, पण ही पिकनिक शेवटचीच ठरली !
मित्रांसोबत पिकनिकला गेलेला तरुण नदीत बुडाला
Image Credit source: Google
| Updated on: Feb 20, 2023 | 2:25 PM

हरिद्वार : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हरिद्वारमध्ये उघडकीस आली आहे. तरुणाचा मृतदेह अद्याप सापडला नसून, आपत्कालीन पथकाकडून शोध सुरु आहे. मयत तरुण एनडीएची तयारी करत होता. पोहण्यासाठी पुलावरुन नदीत उडी घेतल्यानंतर तरुण पाण्यात बुडाला. ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे. अनुप सिंह पटवाल असे मयत तरुणाचे नाव आहे. अनुप मित्रांसोबत शनिवारी हरिद्वारला फिरायला गेला होता. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

सुट्टी असल्याने मित्रांसोबत हरिद्वारला फिरायला गेला होता

मयत अनुप पटवाल हा मूळचा उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील रहिवासी असून, डेहरादून येते एनडीएची तयारी करत होता. शनिवारी सुट्टी असल्याने तो आपल्या मित्रांसोबत हरिद्वार येथे फिरायला गेला होता. यावेळी सर्व मित्र गंगा नदीत अंघोळीसाठी गेले. अनुपने पुलावरुन नदीत डुबकी घेतली.

पाण्यात उडी घेतल्यानंतर काही वेळात नदीत बुडाला तरुण

डुबकी घेतल्यानंतर अनुप पाण्याच्या प्रवाहासोबत पोहत पोहत दूरवर गेला आणि बुडू लागला. त्याने किनाऱ्यावर येण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ये शकला नाही आणि पाण्यात बुडाला. अनुप पाण्यात उडी घेत असताना त्याचा मित्र मोबाईलवर शूट करत होता. घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे.

24 तास उलटले तरी तरुणाचा शोध लागला नाही

घटनेची माहिती मिळताच नदीकिनारी तैनात पोलिसांनी अनुपचा शोध सुरु केला. मात्र 24 तास उलटले तरी अद्याप अनुपचा पत्ता लागला नाही. या घटनेमुळे अनुपच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच एनडीएत भरती होण्याचे अनुपचे स्वप्न अधुरेच राहिले. आपत्कालीन पथक लगातार गंगा नदीत अनुपचा शोध घेत आहे.