सुपारी देऊन पत्नीला संपवले, मग लुटमारीचा बनाव केला; पण अखेर ‘असा’ फसला पोलिसांच्या जाळ्यात

बिहार जिल्ह्यातील बेगुसराय येथील डॉ. प्रशांत कुमार याचे त्याच्या क्लिनिकमधील नर्ससोबत अनैतिक संबंध सुरु होते. प्रशांतच्या पत्नीला या संबंधांची माहिती मिळाल्याने त्या दोघांमध्ये यावरुन वाद आणि हाणामारी होत होती.

सुपारी देऊन पत्नीला संपवले, मग लुटमारीचा बनाव केला; पण अखेर 'असा' फसला पोलिसांच्या जाळ्यात
पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवलेImage Credit source: social
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 1:52 PM

बेगुसराय : अनैतिक संबंधाला विरोध करत असल्याने पतीने पत्नीचा काटा काढल्याची घटना बिहारमधील बेगुसरायमध्ये उघडकीस आली आहे. सुपारी देऊन पत्नीची हत्या करत लुटमारीचा बनाव केला. मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी स्वतःला वाचवू शकला नाही. पोलीस चौकशीत आरोपीचा पर्दाफाश झालाच. पोलिसांनी आरोपी पतीसह चार आरोपींना हत्यारांसह अटक केली आहे. प्रशांत कुमार असे आरोपी पतीचे नाव आहे. मोना राणी असे मयत पत्नीचे नाव आहे. आरोपी पती पेशाने डॉक्टर असून, त्याचे त्याच्याच क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या एका नर्ससोबत अनैतिक संबंध होते.

काय आहे प्रकरण?

बिहार जिल्ह्यातील बेगुसराय येथील डॉ. प्रशांत कुमार याचे त्याच्या क्लिनिकमधील नर्ससोबत अनैतिक संबंध सुरु होते. प्रशांतच्या पत्नीला या संबंधांची माहिती मिळाल्याने त्या दोघांमध्ये यावरुन वाद आणि हाणामारी होत होती. रोजच्या वादाला कंटाळून पतीने पत्नीला आपल्या मार्गातून दूर करण्याचे ठरवले. यासाठी त्याने नियोजनपद्ध पद्धतीने हत्येचा कट रचला.

पतीने दोन शूटर्सना पत्नीच्या हत्येची सुपारी दिली होती. पती बाईकवरुन पत्नी आणि मुलासह गढपुरा येथे चालला होता. याचदरम्यान एका निर्जन ठिकाणी ठरल्याप्रमाणे आरोपी दबा धरुन बसले होते. प्लाननुसार आरोपींनी महिलेवर गोळी झाडून तिची हत्या करत फरार झाले. यानंतर पतीने पोलिसांना हत्येची माहिती देत मोबाईल लुटण्याच्या प्रयत्नात चोरट्यांनी पत्नीची हत्या केल्याचे सांगतिले.

हे सुद्धा वाचा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पतीची चौकशी केली असताना पोलिसांना संशय आला आणि त्यांनी पतीची कसून चौकशी केली. अखेर पतीने सत्य पोलिसांमोर उघड केले. पोलिसांनी आरोपी पतीसह, त्याचा मित्र आणि दोन शार्प शूटर्स अशा चार आरोपींना अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.