Pune-Mumbai highway | पुणे-मुंबई महामार्गावर अपघाताचे सत्र थांबेना ; वेगवान कंटेनरवरील चालकाचं ताबा सुटलं अन … ; तीन दिवसांतील तिसरा अपघात

| Updated on: Feb 01, 2022 | 3:01 PM

पुण्यावरून मुंबईकडे जात असताना कंटेनर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर 15 फूट घसरून पलटी झाला. घसरलेल्या कंटेनरचा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक बसली. यामुळे रिक्षा प्रवासी गंभीर जखमी झालेत.

Pune-Mumbai highway | पुणे-मुंबई महामार्गावर अपघाताचे सत्र थांबेना ; वेगवान कंटेनरवरील चालकाचं ताबा सुटलं अन ... ; तीन दिवसांतील तिसरा अपघात
सांकेतिक फोटो
Follow us on

पुणे- जिल्ह्यातील अपघाताचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. मावळ येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai highway)शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर नारायणगाव जुन्नर रोडवर औटी मळा येथे स्काॅर्पिओ गाडीचा भीषण अपघात ( terrible accident)झाल्याच्या घटना ताज्या असतानाच लोणावळ्या – जुना पुणे- मुंबई महामार्गावर आज सकाळी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. तीन दिवसांच्या कालावधीत घडलेली ही तिसरी घटना आहे. खंडाळा पोलीस( (Khandala Police)  प्रशिक्षण केंद्र साठे मिसळजवळ पुण्यावरून मुंबईकडे अतिवेगाने जाणारा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला त्याच वेळेस खंडाळ्यातून लोणावळच्या दिशेने जाणाऱ्या पॅसेंजर रिक्षाला या कंटेनर ची धडक बसली आहे . हा सर्व अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक दुकानदार आणि लोणावळा शहर पोलीस दाखल होत जखमींना मदत करत रुग्णालयात दाखल केलं आहे.

असा झाला अपघात

पुण्यावरून मुंबईकडे जात असताना कंटेनर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर 15 फूट घसरून पलटी झाला. घसरलेल्या कंटेनरचा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक बसली. यामुळे रिक्षा प्रवासी गंभीर जखमी झालेत. त्यांना लोणावळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सुदैव अपघातात कंटेनर चालक सुखरूप बचावला आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातात पाच जणांचा मृत्यू

दोन दिवसांपूर्वी मावळ येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नारायणगाव जुन्नर रोडवर झालेल्या अपघातातही दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी फोर्ड गाडी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटनेरवर आदळल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र सुरक्षा बल,आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्त तसेच पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरखाली अडकलेली गाडी आणि मृत प्रवाशी यांना बाहेर काढले.

Income Tax : इनकम टॅक्स जैसे थे आहे की खरंच बदललाय? सोप्या शब्दांत समजून घ्या!

IND vs WI ODI Series: वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सीरीजआधी प्रेक्षकांसाठी निराश करणारी बातमी

पोलीस दाम्पत्याचं घरगुती भांडण विकोपाला गेलं, महिलेने जीवनच संपवलं; गडचिरोलीतील मन सुन्न करणारी घटना