Viral Video | सायकलवरुन जाणाऱ्या शाळकरी मुलीची ओढणी टारगट मुलांनी ओढली, समोरुन दुचाकी आल्याने भयंकर घडले…

उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरात 12 वीत शिकणारी एक विद्यार्थीनी शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता सायकलीवरुन घरी येत होती. तेव्हा तिची ओढणी बाईकस्वारांनी ओढल्याने तिचा अपघात घडला.

Viral Video | सायकलवरुन जाणाऱ्या शाळकरी मुलीची ओढणी टारगट मुलांनी ओढली, समोरुन दुचाकी आल्याने भयंकर घडले...
UP VIDEO
Image Credit source: socialmedia
| Updated on: Sep 16, 2023 | 10:02 PM

उत्तर प्रदेश | 16 सप्टेंबर 2023 : उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरात एका शाळकरी मुलीच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शाळेतून घरी जाणाऱ्या एका मुलीची ओढणी काही टारगट मुलांनी ओढल्याने ती सायकलवरुन पडली, नेमकी त्याचवेळी समोरुन वेगाने आलेल्या मोटारसायकलीने या मुलीला उडविल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरुन तीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील हंसवर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर नगरात 12 वीत शिकणारी एक विद्यार्थीनी शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता सायकलीवरुन घरी येत होती. ती हीरापूर बाजारात पोहचली तेव्हा तिच्या शेजारुन मोटार सायकलीवरुन जाणाऱ्या दोघा टारगट मुलांनी तिची ओढणी खेचली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यात मोटार सायकलीवर पाटीमागे बसलेल्या मुलाने तिची ओढणी ओढल्याने तिचा तोल गेला आणि ती रस्त्यात सायकल वरुन पडली. त्याच वेळी दुसऱ्या मोटरसायकलने तिला चिरडल्याने डोक्याला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली.

हाच तो मुलीच्या अपघाताचा व्हिडीओ –

या विद्यार्थीनीच्या डोक्यावरूनच मोटारसायकल गेल्याने ती गंभीर जखमी झाली. तिची मैत्रिणीने तिच्या जवळ जाऊन तीला वाचविण्यासाठी टाहो फोडला. परंतू ती विद्यार्थीनी जागेवरुन हलू शकली नाही. त्यावेळी प्रचंड गर्दी जमली. अखेर तिला उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात नेले. परंतू खूप उशीर झाल्याने डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. या अपघातात मुलीचा जबडा तुटला. या मुलीला ही टारगट मुले त्रास देत होती अशी तक्रार मुलीच्या वडीलांनी नोंदविली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली शहबाज, अरबाज आणि फैजल या तिघांना अटक केली आहे.