Crime News : शेजाऱ्यांच्या बाथरुममध्ये डोकावण्याची संधी मिळताच, सुशिक्षित बँक कर्मचाऱ्याच नको ते कृत्य

Crime News : जेव्हा त्याची चोरी पकडली गेली, त्यावेळी महिलांना मोठा धक्का बसला. दोन्ही रुम्स शेजारी लागून होत्या. त्याचा आरोपीने फायदा उचलला.

Crime News : शेजाऱ्यांच्या बाथरुममध्ये डोकावण्याची संधी मिळताच, सुशिक्षित बँक कर्मचाऱ्याच नको ते कृत्य
Accused Ashok
| Updated on: Jun 26, 2023 | 1:05 PM

चेन्नई : तो PG म्हणून रहायचा. त्याच्या शेजारच्या खोलीत चार महिला PG म्हणून राहत होत्या. या महिला बारमध्ये नोकरी करतात. दोन्ही रुम लागून होत्या. एक दिवस त्याला, तो राहत असलेल्या खोलीतून शेजारी राहणाऱ्या महिलांच बाथरुम नजरेस पडलं. त्याला शेजारांच्या बाथरुममध्ये डोकावण्यासाठी जागा दिसली. त्यानंतर त्याने नको ते कृत्य केलं.

महत्वाच म्हणजे या प्रकरणातील आरोपी सुशिक्षित आहे. तो चांगल्या बँकेत नोकरी करतो. जेव्हा त्याची चोरी पकडली गेली, त्यावेळी महिलांना मोठा धक्का बसला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

पोलिसांनी काय सांगितलं?

आरोपीच नाव अशोक आहे. तो हुडीमधल्या थिगालारापाल्याचा निवासी आहे. तो बँकेच्या क्रेडीट कार्ड विभागात नोकरी करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांच्या पुढचीच खोली अशोकची होती. त्याच्या खोलीतून महिलांच बाथरुम दिसायचं. ही बाब अशोकच्या लक्षात आली.

महिलेने काय पाहिलं?

आरोपीने नंतर मोबाइलच्या मदतीने शूटिंग सुरु केलं. 21 जूनला सकाळी 10 च्या सुमारास एक महिला आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली. त्यावेळी कोणीतरी रेकॉर्डिंग करत असल्याच तिला दिसलं. ती लगेच बाथरुममधून बाहेर निघाली व तिने आरोपीला पकडलं.

तेव्हा तिला धक्का बसला

तिने आरोपीचा मोबाइल चेक केला. तेव्हा तिला धक्का बसला. फक्त तिचेच नाही, तर तिच्यासोबत राहणाऱ्या मैत्रिणीचे व्हिडिओ सुद्धा तिला मोबाइलमध्ये सापडले. अशोकला या महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी अशोकचा मोबाइल जप्त केला आहे.