मोठा झटका, पुणे पोलीस थेट शीतल तेजवाणीच्या माहेरी धडकले… माहेरच्या घरात…
Sheetal Tejwani : पुण्यातील मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीला अटक करण्यात आली आहे. आता याप्रकरणी तिची कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी आज पुणे पोलीसांनी तिच्या माहेरच्या घरी चौकशी केली.

पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरण गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार शीतल तेजवाणीला पुणे पोलीसांनी अटक केली आहे. पुण्यातील 40 एकर शासकीय महार वतन जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करू ती परस्पर हस्तांतरित केल्याचा आणि मुद्रांक शुल्कात शासनाची फसवणूक आरोप शीतलवर आहे. हीच जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला विकण्यात आली होती. अशातच आज शीतलच्या माहेरच्या घरी पुणे पोलीसांची झाडाझडती घेतली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शीतलच्या माहेरच्या घरी झाडाझडती
पुणे पोलीसांनी दोन वेळा चौकशी केल्यानंतर शीतल तेजवाणीला 3 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज पोलीसांनी शीतल तेजवाणीच्या पिंपरीतील माहेरच्या घरी झाडाझडती घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या शीतलकडून महत्वाची हस्तगत करण्यासाठी ही झाडाझडती घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. ही कागदपत्रे मिळाल्यास या जमीन व्यवहाराबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची कागदपत्रे मिळण्याची आशा
पोलीसांना मूळ कुलमुखत्यार पत्र, मूळ दस्त, तसेच 300 कोटींपैकी काही रक्कम हस्तगत करायची आहे. त्यामुळे पुणे पोलीस शीतलच्या पिंपरीच्या घरी आले असल्याची माहिती समोर आली आहे. शीतल आणि तिचा पती सागर सूर्यवंशी सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. मात्र तिचे माहेर हे पिंपरीतील वैष्णो देवी मंदिराजवळ आहे. शीतलने याचं माहेरच्या घरात काही पुरावे लपवून ठेवल्याची शंका शंका पुणे पोलीसांना आहे, त्यामुळे ही चौकशी करण्यात येत आहे.
कोरेगाव पार्कमधील घरीही झाडाझडती
पिंपरीनंतर पोलीस शीतल तेजवाणीच्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथील घरी पोहोचले असून गेल्या तासभरापासून झाडाझडती सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शीतल तेजवाणीच्या घरात काही इलेक्ट्रिक डिव्हाइस किंवा काही कागदपत्रे सापडण्याच्या अपेक्षेने पोलिसांकडून ही तपासणी सुरू आहे. या झाडाझडतीतून नेमकं काय समोर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारु तिघांवर मुद्रांक शुल्कात फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शीतल तेजवानी यांच्याकडे संबंधित जागेची पावर ऑफ अॅटर्नी आहे. जमीन खरेदीखत शीतल तेजवानीने लिहून दिलं. अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांनी ते लिहून घेतलं. उपनिबंधक रवींद्र तारु यांनी कागदपत्र तयार करुन दिली त्यामुळे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
